चेन्नईच्या फाफ डु प्लेसिसचा फाडू पफॉर्मन्स

चेन्नईच्या फाफ डु प्लेसिसचा फाडू पफॉर्मन्स

चेन्नई सुपर किंग्ज

मंगळवारी संध्याकाळी आयपीएलच्या अकराव्या सीझनचा पहिला क्वॉलिफायर सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडिअममध्ये खेळला गेला. या अटीतटीच्या सामन्यात चेन्नई सुपरकिंगचा विजय झाला. चेन्नईच्या या विजयामागे फाफ डू प्लेसिसची कामगिरी महत्वाची ठरली. त्याने नाबाद ४२ चेंडूंमध्ये ६७ धावांची खेळी करत चेन्नईला विजयापर्यंत पोहोचवले.

चेन्नईने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय

कालच्या महत्त्वाच्या सामन्याच्या सरुवातीला चेन्नईने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. सामना सुरु झाल्यावर पहिल्याच चेंडूत चेन्नईच्या दीपक चहारने शिखर धवनचा त्रिफळा उडवून सनरायझर्सला पहिला झटका दिला. त्याच षटकात केन विल्यम्सने तीन चौकार मारून चेन्नईला आव्हान दिले. परंतु, हैदराबादच्या हा आनंद फार थोडा काळ टिकला. चौथ्या षटकात श्रीवत्स गोस्वामीला बाद केले. त्यानंतर केन विल्यम्सही बाद झाला. विल्यम्सने १५ चेंडूत २४ धावा केल्या. त्याने वेगवान खेळत चार चौकार मारले. पण चेन्नईच्या शार्दुल ठाकूरने त्याला थांबवले. रविंद्र जडेजाने मनिष पांडेला बाद केले. चेन्नईच्या आक्रमक गोलंदाजांसमोर हैदराबादचे फलंदाज टिकाव धरण्यात अपयशी ठरले. हैदराबादची १२ षटकांत ५ बाद ६९ अशी अवस्था झाली होती. पण, नंतर कार्लोस ब्रेथवेटने आक्रमक फलंदाजी केली आणि हैदराबादचा डाव सावरला. ब्रेथवेटने नाबाद २९ चेंडूंत ४३ धावा केल्या. या जोरावर हैदराबादने पहिल्या डावात चेन्नईसमोर १४० धावांचे लक्ष ठेवले.

चेन्नईही गंडली!
हैदराबादने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईचा डाव गडगडला. चेन्नईचे मातब्बर फलंदाज एकामागे एक बाद होऊ लागले. शेन वॉटसन, अंबाती रायुडू, महेंद्रसिंग धोनी, ड्वेन ब्राव्हो चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरले. हैदराबादच्या हैदराबादचा गोलंदाज राशिद खानने ४ षटकांत फक्त ११ धावा देत २ फलंदाजांना बाद केले. सिद्धार्थ कौल आणि संदीप शर्मा यांनी प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या. तर, भुवनेश्वर कुमारनेही चेन्नईचा १ गडी बाद करत सामन्यात चुरस निर्माण केली.

चेन्नई फायनलमध्ये तर हैदराबाद एलिमिनेटरमध्ये
या विजयामुळे चेन्नई सुपर किंगचा प्रवेश थेट अंतिम फेरीत झाला असून, हैदराबादला अंतिम फेरीसाठी पुन्हा झुंजावं लागणार आहे. हैदराबादला एलिमिनेटर सामना खेळावा लागणार आहे. आज होणाऱ्या दुसऱ्या क्वालिफाईंग सामन्यात विजयी ठरणारी टीम एलिमिनेटर सामन्यात हैदराबादसोबत खेळेल.

First Published on: May 23, 2018 12:08 PM
Exit mobile version