साईभक्तांसाठी खुशखबर! चेन्नईपाठोपाठ दिल्ली-शिर्डी विमानसेवा सुरू

साईभक्तांसाठी खुशखबर! चेन्नईपाठोपाठ दिल्ली-शिर्डी विमानसेवा सुरू

शिर्डी – भाविकांसाठी साई मंदिर खुलं झाल्यानंतर १० ऑक्टोबरपासनं शिर्डीचं विमानतळही सुरू झालंय. सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर १० तारखेला चेन्नईहून १६७ प्रवासी घेऊन पहिलं विमान शिर्डी विमानतळावर आलं. सुरुवातीला चेन्नई-शिर्डी अशी एकच विमानसेवा सुरू झाल्यानं इतर शहरांमधल्या भाविकांकडूनही विमानसेवेची मागणी केली जातेय.

या पार्श्वभूमीवर आज दिल्लीहून स्पाईसजेटचं विमान १३० प्रवाशांना घेऊन शिर्डीत दाखल झालं. तर, शिर्डीहून ४० प्रवासी घेऊन हेच विमान पुन्हा दिल्लीकडे रवाना झालं. विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळत असल्यानं लवकरच हैद्राबाद, मुंबई आणि बेंगळूरू या शहरांमधूनही शिर्डीसाठी विमानसेवा सुरू होणार असल्याचं विमानतळाचे संचालक सुशीलकुमार श्रीवास्तव यांनी सांगितलं. विमानतळ सुरू झाल्यानं शिर्डीसह काकडी ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. यानिमित्तानं अनेक महिन्यांपासनं थांबलेलं अर्थचक्र फिरू लागलंय.

First Published on: October 12, 2021 4:00 PM
Exit mobile version