रेवदंड्यात बुडाला मालवाहू तराफा, चेतक हेलिकॉप्टरने १६ खलाशांना वाचवण्यात यश

रेवदंड्यात बुडाला मालवाहू तराफा, चेतक हेलिकॉप्टरने १६ खलाशांना वाचवण्यात यश

रेवदंड्यात बुडाला मालवाहू तराफा, चेतक हेलिकॉप्टरने १६ खलाशांना वाचवण्यात यश

रायगड जिल्ह्यातील रेवदंडामध्ये खराब वातावरणामुळे समुद्रात मालावहू तराफा बुडाले आहे. रेवदंडा येथून एमवी मंगलम हा मालवाहू तराफा निघाला होता या मघ्ये १६ कर्मचारी होते परंतु काही अंतरावर गेल्यानंतर समुद्र खवळला असल्यामुळे तराफा बुडाला आहे. तराफा बुडाल्याची घटना कळताच तटरक्षक दलाने तातडीने मदत व बचावकार्य मोहीम हाती घेतली आणि या १६ कर्मचाऱ्यांना सुखरुप वाचवण्यात यश आलं आहे. तराफ्यातील कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी दमण येथून दोन चेतक हेलिकॉप्टर रवाना झाले होते या हेलिकॉप्टरच्या मदतीनं चित्तथरारक बचावकार्य करण्यात आले आहे.

रेवदंडा बंदरातून मालवाहू एमवी मंगलम तराफा मुंबईच्या दिशेने रवाना झाला होता. परंतु समुद्रात काही किलोमीटरवर तराफा गेला होता समुद्रा खवळला असल्यामुळे तराफा बुडू लागला. धोक्याची शक्यता ओळखून कर्मचाऱ्यांनी तटरक्षक दलालाशी संपर्क केला होता. तटरक्षक दलातर्फे मदत आणि बचाव कार्य सुरु करण्यात तटरक्षक दलाचे सुभद्रा कुमारी चौहान जहाज सकाळी ८ वाजता जंजीरा येथून रेवदंड्याला रवाना करण्यात आले तसेच दमण येथून २ चेतक हेलिकॉप्टर पाठवण्यात आले. समुद्र किनारी तटरक्षक दलाचे जवान उपस्थित होते.

चेतक हेलिकॉप्टरने बार्जवरील १६ खलाशांना रेस्क्यू करण्याय यश आले आहे. महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडत असून समुद्रात जोरदार वारे वाहत आहे. यामुळे समुद्राच्या लाटा उंच निर्माण झाल्या आहेत. समुद्र खवळला असल्यामुळे मोठी हानी झाली आहे. परंतु कोणतीही जिवितहानी झाली नाही. खलाशी आणि कॅप्टन यांना तराफ्यावरुन सुखरुप सुटका केल्यानंतर त्यांना वैद्यकीय उपचार करण्यात आले आहेत.

तराफ्यात २४ किलो लीटर इंधन

रेवदंडा बंदरातून निघालेल्या एमवी मंगलम तराफ्यात २४ किलो लीटर इंधन आहे. तराफा समुद्रात गेल्यावर पाणी भरल्यामुळे एका बाजूला झूकला गेला यामुळे धोक्याची घंटा ओळखून खलाशी आणि कॅप्टनने तटरक्षक दलाला बाचावासाठी कळवण्यात आले. तराफ्यावरील बोटने ३ कर्मचाऱ्यांना वाचवण्यात आले तर हेलिकॉप्टरच्या मदतीने १३ जणांचे प्राण वाचवण्यात यश आल आहे. या तराफ्यात २४ किलो लीटर इंधन असल्यामुळ चिंता निर्माण झाली आहे. तसेच याबाबत स्थानिक प्रशासनाला कळविणयात आले आहे.

First Published on: June 17, 2021 6:02 PM
Exit mobile version