Lockdown crisis: राज ठाकरेंच्या ‘त्या’ सूचनेला छगन भुजबळांचा पाठिंबा

Lockdown crisis: राज ठाकरेंच्या ‘त्या’ सूचनेला छगन भुजबळांचा पाठिंबा

मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राज्यातील वाईन्स शॉप सुरु करण्याची मागणी केली होती. लॉकडाऊनमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला खिळ बसलेली आहे. या गाळात रुतलेले अर्थव्यवस्थेचे चाक बाहेर काढण्यासाठी सोशल डिस्टसिंगचे नियम पाळून वाईन्स शॉप सुरु करावेत, अशी सूचना राज ठाकरेंनी केली होती. शिवसेनेचे मूखपत्र सामनातून राज यांच्या सूचनेवर टीका करण्यात आली असली तरी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मात्र राज ठाकरेंना पाठिंबा दिला आहे. एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना भुजबळ यांनी सांगितले की, “राज ठाकरे यांची सूचना ही वास्तवतेला धरून आणि राजकारणापलीकडची आहे.”

भुजबळ म्हणाले की, “कोरोनामुळे अर्थव्यवस्था मंदावली आहे. आरोग्य सेवा आणि इतर गोष्टींवरील खर्च वाढला असून उत्पन्न घटले आहे. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी केलेली सूचना वास्तवतेला धरून आणि राजकारणापलीकडची आहे. सध्या पेट्रोल, डिझेल, स्टॅम्प ड्यूटी असे उत्पन्नाचे स्त्रोत बंद आहेत. केंद्राकडून जीएसटीचा परतावा येणे बंद झालेले आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या मागणीकडे मद्यविक्री म्हणून नाही तर उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून पाहिले पाहीजे. आज ना उद्या राज्याला हा निर्णय घ्यावा लागणार आहे.”

First Published on: April 25, 2020 4:48 PM
Exit mobile version