मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज घेणार समृद्धी महामार्गाची ट्रायल

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज घेणार समृद्धी महामार्गाची ट्रायल

नागपूर – समृद्धी महामार्गाचे लोकार्पण करण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. त्याआधी आज, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समृद्धी महामार्गाची ट्रायल घेण्याकरता नागपूर ते शिर्डी असा प्रवास करणार आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमधील हिंगणा तालुक्यातील सालईदाभा या टोल नाक्याजवळ शनिवारी भेट दिली होती. त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित होते. यावेळी त्यांनी रस्त्याच्या कामाची पाहणी आणि लोकार्पण कार्यक्रमाचा आढावा घेतला. तर, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूरला जाऊन १०.१५ च्या दरम्यान महामार्गाच्या झिरो पॉईंटवर पोहोचणार आहेत. तेथून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासब ते शिर्डीपर्यंत प्रवास करणार आहेत.

विदर्भ, मराठवाड्याला जोडणारा हा समृद्धी महामार्ग प्रकल्प देवेंद्र फडणवीस यांचा ड्रिम प्रोजेक्ट आहे. त्यामुळे या कामाच्या पूर्णत्वाकडे त्यांनी जातीने लक्ष दिलं होतं. मधल्या काळात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर समृद्धी महामार्गाचे काम रखडले होते. मात्र, आता जलद गतीने हे काम करून नागपूर ते शिर्डी असा मार्ग ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकार्पण करण्यासाठी येणार आहेत.

असा असेल मुख्यमंत्र्यांचा दौरा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज समृद्धी महामार्गाचा दौरा करणार आहेत. सकाळी 9 वाजता मुंबईतील निवसस्थानावरून ते विमानतळाकडे जातील तिथून थेट नागपूर येथे पोहोचले. सकाळी 10.30 पासून त्यांचा समृद्धी महामार्गाचा ( झिरो माईल गार्डनपासून) पाहणी दौरा सुरू झाला. त्यानंतर ते नागपूर ते शिर्डी आशा 520 किलोमीटर लांबीच्या नागपूर-शिर्डी मार्गाची समृद्धी महामार्गावर रस्तेमार्गाने पाहणी करून संध्याकाळी 5.30 वाजता शिर्डी येथे पोहोचतील. त्यानंतर शिर्डीवरून दिल्लीला जी-20 परिषदेच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने पार पडणाऱ्या विशेष बैठकीसाठी रवाना होतील.

First Published on: December 4, 2022 9:43 AM
Exit mobile version