मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार अयोध्या दौऱ्यावर; रामलल्लाच्या दर्शनासाठी नोव्हेंबरचा मुहूर्त

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार अयोध्या दौऱ्यावर; रामलल्लाच्या दर्शनासाठी नोव्हेंबरचा मुहूर्त

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. अयोध्येत जाऊन ते रामलल्लाचं दर्शन घेणार आहेत. मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्यानंतर ते पहिल्यांदाच अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याने राजकीय क्षेत्रातील सर्वांचं लक्ष या दौऱ्याकडे असणार आहे. नोव्हेंबरमध्ये ते दौऱ्यावर जातील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी साधलेल्या अनौपचारिक संवादात सांगितले.

वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. यावेळी त्यांनी अयोध्या दौऱ्याची माहिती दिली. नोव्हेंबरमध्ये हा दौरा होणार आहे. यावेळी रामलल्लाच्या दर्शनासह ते मोठे शक्तीप्रदर्शन करण्याचीही शक्ता आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारण्याआधी अयोध्येला भेट दिली होती

त्यावेळी त्यांच्यासोब आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि इतर पदाधिकारीही होते. शिवसेनेत बंड केल्यानंतर ते आता पहिल्यांदाच मुख्यमंत्री म्हणून अयोध्येत जाणार आहेत.

First Published on: October 26, 2022 12:06 PM
Exit mobile version