मुख्यमंत्री ठाकरे आज घेणार कोरोनाचा आढावा

मुख्यमंत्री ठाकरे आज घेणार कोरोनाचा आढावा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सकाळी ओझर विमातनळावर आगमन झाले. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्हा प्रशासनाच्यावतीने मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. ओझर येथून मुख्यमंत्री नंदूरबारकडे रवाना झाले असून दुपारी ओझर विमानतळावर नाशिक जिल्हयाच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे.

मुख्यमंत्र्यांसमवेत मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास उपस्थित होते. तसेच यावेळी आमदार दिलीप बनकर, माजी आमदार अनिल कदम, पोलीस आयुक्त दिपक पांडेय, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, उपस्थित होते. राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असलेल्या जिल्हयांमध्ये नाशिकचा सामावेश असून नंदुरबारहून मुंबईकडे परततांना मुख्यमंत्री ओझर विमानतळावर जिल्हयाच्या एकूणच परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

 

First Published on: March 19, 2021 12:31 PM
Exit mobile version