मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी शिवसेनेच्या रुग्णवाहिकांचं लोकार्पण

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी शिवसेनेच्या रुग्णवाहिकांचं लोकार्पण

शिवसेना प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बीकेसी येथे शिवसेनेच्या रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित केलं. आज सर्व रुग्णवाहिका बघितल्यानंतर जुना काळ आठवला, असं उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसैनिकाची ओळख ही कोणतंही संकट येवो, झोकून काम करुन नागरिकांना मदत करणं ही आहे, असं म्हणत शिवसैनिकांचं मनोबल उंचावलं.

“शिवसेना म्हटलं की रुग्णवाहिका. आज सर्व रुग्णवाहिका बघितल्यानंतर जुना काळ आठवला. प्रत्येक शाखेच्या रुग्णवाहिका होत्या,” असं उद्धव ठाकरे म्हणाले. मुंबईच्या कामाचं वॉशिंग्टन पोस्टने कौतुक केलं, याचा देखील उल्लेख केला. काम करताना शिवसैनिकांनी काळजी घ्यावी, असा सल्ला उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिला.


हेही वाचा – ‘मार्गदर्शक तत्वे’ ठरवून देण्याची राज्यपालांची मागणी


मी काही ट्रम्प नाही – उद्धव ठाकरे

सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मॅरेथॉन मुलाखत घेतली. यावेळी अनेक गोष्टींवर उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं. “लॉकडाऊन हा आपण लागू केलेला आहेच. आपण या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. आपण अनलॉक म्हणजे आता एकएक गोष्टी सुरु करत चाललो आहोत. नाहीतर सारखं लॉकडाउन १ अनलॉक १, लॉकडाऊन २ अनलॉक २ असे प्रकार होतील. घाईघाईनं लॉकडाऊन केला हे चुकीचं आहे. तसंच घाईघाईनं अनलॉक करणंही चुकीचं आहे,” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीदरम्यान ते बोलत होते. तसंच एकदम सर्व सुरू करण्यासाठी मी म्हणजे काही ट्रम्प नाही. मी माझ्या लोकांना तळमळताना पाहू शकणार नाही, असंही ते म्हणाले.

 

First Published on: July 25, 2020 7:11 PM
Exit mobile version