दुसऱ्या मजल्यावरून पडून चिमुकल्याचा मृत्यू 

दुसऱ्या मजल्यावरून पडून चिमुकल्याचा मृत्यू 

घरात बॅटबॉल खेळत असताना दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.29) रात्री 7.30 वाजेदरम्यान रुद्रा एव्हेन्यु, कोमल स्वीटजवळ, शिवाजीनगर, सातपूर येथे घडली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मास्टर गौरव शरद शेवाळे असे मृताचे नाव आहे.

  पोलिसांच्या माहितीनुसार, गौरव राहत्या घरात बॅटबॉल खेळत होता. घरातील कोणाचे लक्ष नसताना तो दुसऱ्या मजल्यावरून तोल जावून खाली पडला. त्यात तो गंभीर जखमी झाला. ही बाब कुटूंबियांना समजताच त्याला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करत त्याला मृत घोषित केले. पुढील तपास पोलीस हवालदार भूमकर करत आहेत.
First Published on: July 30, 2020 9:40 AM
Exit mobile version