‘ए काऊ’! ही हाक पुन्हा प्रेक्षक अनुभवणार, कारण सुरू होत आहे ‘चिमणराव आणि गुंड्याभाऊ’

‘ए काऊ’! ही हाक पुन्हा प्रेक्षक अनुभवणार, कारण सुरू होत आहे ‘चिमणराव आणि गुंड्याभाऊ’

लॉक डाऊनच्या काळात घरी बसून काय करावं असा प्रश्न पडलेल्यांसाठी ‘रामायण’ ‘महाभारत’ आणि ‘शक्तीमान’ या जून्या मालिका दाखविल्या जात आहेत. या मालिकांबरोबरच लवकरच ‘ए काऊ..ए काऊ’ हा आवाज घराघरात ऐकू येणार आहे. कारण आता “चिमणराव आणि गुंड्याभाऊ” या मालिकेचेही पुन:प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

मुंबई दूरदर्शनवरून सादर झालेली ‘चिमणराव-गुंडय़ाभाऊ’ ही मालिका खूप गाजली. अगदी अमराठी प्रेक्षकांमध्येही ही मालिका लोकप्रिय होती.  विनोदी लेखक चि. वि. जोशी यांनी लिहिलेल्या ‘चिमणराव व गुंडय़ाभाऊ’च्या गोष्टींवर ही मालिका आधारित होती. छोटय़ा छोटय़ा प्रसंगातून घडणारी सहज विनोदनिर्मिती, खळाळून हसविणारा निखळ विनोद आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन या मालिकेतून सहजपणे मांडण्यात आला होता.

ए काऊ …ए काऊ… अशी आपल्या बायकोला हाक मारणारे चिमणराव… किंवा ‘चिमण, अरे चिमण्या हा काय घोळ घालून ठेवला आहेस तू, आता तो मलाच निस्तरावा लागणार’ म्हणाणारे गुंड्याभाऊ आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. पण आथा लॉकडाऊनच्या निमित्ताने ही मजा पुन्हा एकदा प्रेक्षकांना घेता येणार आहे. सह्याद्री वाहिनीवर “चिमणराव आणि गुंड्याभाऊ” ही मालिका रोज रात्री ७.३० वा. आणि रात्री १०.०० व. दाखवण्यात येणार आहे.

First Published on: April 1, 2020 1:26 PM
Exit mobile version