“अस वाटतं पुणेकरांची मराठी मुंबईकरांपेक्षा वीक”, चित्रा वाघ यांचे वक्तव्य

“अस वाटतं पुणेकरांची मराठी मुंबईकरांपेक्षा वीक”, चित्रा वाघ यांचे वक्तव्य

“मला अस वाटतं पुणेकरांची मराठी मुंबईकरांपेक्षा वीक आहे”. असे वक्तव्य भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केलं आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्या नावाची घोषणा झाल्यावर शूर्पणखा बसवू नका असे वक्तव्य केलं होते. याबाबत चित्रा वाघ यांना पुन्हा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना चित्रा वाघ यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी वाक्याचा गैरसमज केल्यामुळे असं वाटतं की पुणेकरांची मराठी मुंबईकरांपेक्षा वीक आहे असे वक्तव्य केलं आहे.

भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ पुणै दौऱ्यावर होत्या यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. चित्रा वाघ यांनी शूर्पणखा या विधानावर भूमिका मांडताना म्हटलं आहे की, शूर्पणखा म्हणजे कोणाचे नाव थोडीच आहे. मी फक्त उपमा दिली होती की रावणाला मदत करणारी शूर्पणखा नको. राज्यात रावण खूप फिरत आहेत. मी तुम्हाला तीन रावण दाखवले आहेत. असे अनेक रावण राज्यात आहेत त्यामुळे त्यांना मदत करणारी शूर्पणखा नको असे कोणा एका व्यक्तिला म्हणाले नाही असे चित्रा वाघ यांनी सांगितले आहे. महाविकास आघाडी तीन पक्षाचे सरकार आहे त्यामुळे तुम्ही कोणालाही बसवा पण शूर्पणखेला बसवू नका. शू्र्पणखा काय तर रावणाला मदत करणारी शूर्पणखा हे मला माहिती आहे. बहीण जरी असेल आणि चुकिचा कामात जर मदत करत असेल तर ते आम्हाला कसे चालेल असे चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. जर पुण्यात कोण शूर्पणखा असेल तर आम्हाला कळवा असेही चित्रा वाघ यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान त्या आता कुठे पदावर बसल्या आहेत. त्यांना पहिले काम समजू द्या त्यानंतर आम्ही सुरुवात करु मग समजेल शूर्पणखा आहे की नाही? ते बोलले नाही तर आम्ही बोलूच आम्ही आहोतच. अजून कुठे काम दिसलं नाही आहे. जर एखाद्याला कुठले काम दिले तर त्याला शिकायला २ महिन्यांचा कालावधी लागतो त्यामुळे त्यांना काम करु द्या समजू द्या नंतर आम्ही बोलूच असा एक प्रकारे इशारा चित्रा वाघ यांनी दिला आहे.

तिथे कोण बसले आहे ते महत्त्वाचे नाही तर ते संविधानिक पद आहे. त्या पदाची गरीमा मला माहिती आहे. ते अतिशय आदाराचे आणि मानाचे स्थान आहे. म्हणून अशा पदावर शूर्पणखा देऊ नका असे मी म्हणाले होते. रावणाला मदत करणारी शूर्पणखा जर त्या पदावर आली तर राज्यातील महिलांचे काय होणार? असा त्याचा आशय होता असे चित्रा वाघ यांनी यावेळी सांगितले आहे.

जेव्हा कुठलीही महिला जेव्हा अधिकार पदावर जाते तेव्हा तिच्याकडून हजारो महिलांच्या अपेक्षा वाढतात. त्यामुळे त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. परंतु सुरुवातीला त्यांना पहिले काम शिकू द्या लगेच त्यांच्यावर टीका आणि भडीमार करणे योग्य नाही. त्या शिकल्यावर पाहूयात असे वक्तव्य चित्रा वाघ यांनी केलं आहे.


हेही वाचा : Nagar panchayat election: राज्यात १०५ नगरपंचायतींसाठी निवडणूक जाहीर, राज्य निवडणूक आयुक्तांची घोषणा


 

First Published on: November 24, 2021 9:43 PM
Exit mobile version