महाविकास आघाडी नव्हे तर महाकन्फ्यूज आघाडी जास्त वाटते, चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकारवर निशाणा

महाविकास आघाडी नव्हे तर महाकन्फ्यूज आघाडी जास्त वाटते, चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकारवर निशाणा

"हा तर गुंडा राज, काय करतय सरकार?'' कल्पिता पिंपळे हल्ल्याप्रकरणी चित्रा वाघ ठाकरे सरकारवर बसरल्या

राज्यात कोरोना रुग्णांना मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज भासत आहे. रेमडेसिवीरच्या पुरवठ्यावरुन गेल्या २ दिवसांपासून महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात कलंगीतुरा रंगला आहे. ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पोलीस कार्यालयात पोहचले होते. यानंतर राज्यात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायाल मिळाला परंतु आता या प्रकरणावर संबंधित विभागाच्या मंत्र्यांनी मौन बाळगले असताना इतर मंत्र्यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. यावरुन भाजप उपप्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीला महाकन्फ्यूज आघाडी सरकार म्हणून संबोधले आहे. या सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

भाजप उपप्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात मागील २ दिवसांपासून रेमडेसिवीर इंजेक्शनावरुन सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने तमाशा केला आहे. यामध्ये आश्चर्याची गोष्ट अशी आहे की, ज्या विभागाच्या मंत्र्यांनी यावर बोलले पाहिजे त्यांना सोडून इतर सर्व मंत्री टीका करायला लागले. परंतु टीका करण्यापूर्वी त्या मागील सत्यता संबंधित विभागाच्या मंत्र्यांना तरी विचारा असा टोला चित्रा वाघ यांनी राज्य सरकारला लगावला आहे. तसेच महाविकास आघाडीच्या मंत्र्यांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. त्यामुळे हे महाविकास आघाडी सरकार कमी आणि महाकन्फ्यूज सरकार जास्त आहे. सारखे सारखे तोंडावर पडणे यांना आवडले असावे असा खोचक टोला भाजप उपप्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी राज्य सरकारला लगावला आहे.


राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनच्या पुरवठ्यावरुन सुरु असलेल्या हाय व्होल्टेज ड्रामावर राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी भाजपच्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे. भाजपद्वारे जे रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदी केले होते ते राज्य सरकारलाच मिळणार होते. त्याबाबत परवानग्या देखील देण्यात आल्या होत्या असे राजेंद्र शिंगणे यांनी म्हटले आहे. त्यामुळे यानंतर भाजप नेत्यांनी पुन्हा महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले आहे.

रेमडेसिवीर इंजेक्शन सरकारच्या माध्यमातूनच विकता येतील

महाराष्ट्रामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनच्या साठ्याबद्दल उलट सुलट तर्क लावण्यात येत आहेत. मी राज्याचा अन्न व औषध प्रशासन मंत्री या नात्याने सांगू इच्छितो की केंद्र सरकारने रेमडेसिवीरच इंजेक्शनची निर्यात बंदी केलेल्या रेमजेसिवीरची विक्री महाराष्ट्रात करत असताना नियम आहेत कायदे आहेत त्याप्रमाणे कोणत्याही संस्थेला आणि कोणत्याही पक्षाला दान किंवा खरेदी करता येत नाहीत. सरकारच्या माध्यमातून विकता येतील आणि सरकारला देता येतील यामध्ये भाजपचे स्पष्टपणे असे चालू आहे की, अशा प्रकारचा साठा ते स्वतः विकत घेऊन मला देणार होते परंतु तसे निश्चितपणे नाही आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन याला निर्यातबंदी घातलेली आहे. हे इंजेक्शन कोणत्याही संस्थेला, पक्षाला घेता येत नाही आणि देताही येत नाही. हे इंजेक्शन सरकारच्या माध्यमातून विकता येतील असा खुलासा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी केला आहे.

First Published on: April 20, 2021 4:15 PM
Exit mobile version