राज्यातील बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर

राज्यातील बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर

दहावीचा निकाल

महाराष्ट्र माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल आज, शुक्रवारी जाहीर झाला आहे. हा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे. यंदाच्या फेरपरीक्षेत केवळ २३.१७ टक्के निकाल लागला असून केवळ ३० हजार ४३८ विद्याार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या फेरपरीक्षेचा निकाल अर्धा टक्काच वाढला आहे. राज्य मंडळाच्या प्रभारी अध्यक्ष डॉ. अशोक भोसले यांनी ही माहिती दिली.

मार्च २०१९ मध्ये झालेल्या परीक्षेतील नापास झालेल्या विद्याार्थी आणि श्रेणी सुधारण्यासाठी इच्छुक असलेल्या राज्यभरातील विद्यार्थ्यांनी जुलै-ऑगस्टमध्ये फेरपरीक्षा दिली होती. ही परीक्षा १७ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान झाली होती. फेरपरीक्षेसाठी १ लाख ३१ हजार ६०३ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. परंतू, प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या १ लाख ३१ हजार ३५५ विद्यार्थ्यांपैकी केवळ ३० हजार ४३८ विद्यार्थीच उत्तीर्ण होऊ शकले. २०१८ आणि २०१७ मध्ये झालेल्या फेरपरीक्षेच्या निकालाची टक्केवारी अनुक्रमे २२.६५ टक्के आणि २४.९६ टक्के होती. या फेरपरीक्षेत लातूर विभागाचा निकाल सर्वाधिक ३३.८९ टक्के आणि मुंबई विभागाचा निकाल सर्वांत कमी १९.१२ टक्के लागला आहे.

First Published on: August 23, 2019 3:09 PM
Exit mobile version