दसरा मेळाव्यांसाठी गर्दी जमवण्याकरीता दोन्ही गटांकडून हजारो एसटी, खासगी बसेसचे बुकिंग

दसरा मेळाव्यांसाठी गर्दी जमवण्याकरीता दोन्ही गटांकडून हजारो एसटी, खासगी बसेसचे बुकिंग

मुंबईतील दोन ठिकाणी इतिहासात प्रथमच शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे. गेली अनेक वर्ष दादरच्या शिवाजी पार्क येथे शिवसेनेचा दसरा मेळावा होत आहे. मात्र, यंदा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत भाजापासोबत सरकार स्थापन केले. त्यामुळे शिवसेनेत उभी फुट पडली आहे. शिवाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा दसरा मेळावा होणार असल्याचे म्हटले. त्यामुळे मुंबई यंदा शिवाजी पार्क आणि वांद्रे कुर्ला संकुलन (बीकेसी) येथे शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे. विशेष म्हणजे या मेळाव्यासाठी सध्या गर्दी जमवण्यासाठी हजारो एसटी, खासगी बसेसचे बुकिंग करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. (CM Eknath Shinde And Shiv sena chief Uddhav Thackeray Group Preparation for Dasra Melava in mumbai)

दसरा मेळाव्याकरीता गर्दी जमवण्यासाठी ठाकरे व शिंदे गटाकडून सध्या जोरदार तयारी सुरू असून, वाहनांमधून अधिकाधिक कार्यकर्त्यांना मुंबईत घेऊन येण्याची स्पर्धा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. लहान-मोठ्या अशा एकूण 10 हजार वाहनांमधून कार्यकर्ते मुंबईत दाखल होणार आहेत. यामध्ये 6 हजार एसटी तसेच खासगी बसगाड्यांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने सोमवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 1800 एसटी गाड्यांचे आरक्षण केले होते. 3 हजार खासगी गाड्यांचे यापूर्वीच आरक्षण पूर्ण झाले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाने 1400 खासगी बस आरक्षित केल्या आहेत. मुंबई महानगर प्रदेशातील शिवसेनेच्या शाखाप्रमुख, नगरसेवक यांना स्वखर्चाने कार्यकर्ते सभास्थळी येण्याच्या सूचना आहेत.


हेही वाचा – कोल्हापुरात कुस्तीच्या सरावावेळी 23 वर्षीय पेहलवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

First Published on: October 4, 2022 1:24 PM
Exit mobile version