बोरघाट बस अपघात : मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

बोरघाट बस अपघात : मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर शिंगरोबा मंदिराच्या मागे असलेल्या दरीत खासगी बस कोसळली. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. बोरघाटातील शिंगरोबा मंदिरजवळ पहाटे ४च्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. या अपघाताची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. तसेच चौकशी केल्यानंतर मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. खासगी बस घाटामध्ये पडून दुर्घटनाग्रस्त झाली. त्यामध्ये एकूण ४२ प्रवासी होते. परंतु त्यामधील १२ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर २८ जण जखमी आहे. त्याचप्रमाणे १ जण बेपत्ता आहे. सगळ्या जखमींची पाहणी केली आहे. पाच जण त्याच्यामध्ये अत्यंत गंभीर परिस्थितीत आहेत. त्यांच्यावर उपचार प्रक्रिया सुरू आहे. डॉक्टरांनाही योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु मृतांना आणि नातेवाईकांना शासनाच्या वतीने ५ लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

जे जखमी आहेत. त्यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासनाच्या वतीने केला जाईल. त्यांना कुठलाही खर्च करावा लागणार नाही, अशा प्रकारचा निर्णय शासनाने घेतला आहे. या दुख:द घटनेची दखल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील घेतली. त्यांनी देखील संवेदना कळवल्या आहेत. जे बारा मृत झालेत त्यांच्या देखील नातेवाईकांच्या दुख:त आम्ही सहभागी आहोत. पुढील प्रक्रिया करण्याच्या तात्काळ सूचना देण्यात आल्या आहेत, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

मुंबई-पुणे महामार्गावर पूर्वी होणार अपघात आणि आता होणार अपघात याची आकडेवारी जर आपण पाहिली तर त्यामध्ये मोठा फरक आहे. काही कारणास्तव दुर्दैवीपणे अपघात होतात, त्याची कारणं देखील वेगवेगळी आहेत. परंतु अपघात होऊ नये यासाठी प्रिव्हेंटिव्ह अॅक्शन आपण घेतल्यामुळे अपघातांची संख्या कमी झाली आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या नातेवाईकांना २ लाखांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींना ५० हजारांची मदत पंतप्रधानांकडून करण्यात येणार आहे.


हेही वाचा : जुन्या पुणे- मुंबई महामार्ग अपघात: मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर


 

First Published on: April 15, 2023 1:13 PM
Exit mobile version