डोंबिवलीच्या शिवसेनेच्या शाखेतील फोटोवरून शिंदे समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये राडा

डोंबिवलीच्या शिवसेनेच्या शाखेतील फोटोवरून शिंदे समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये राडा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राजभरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचा विरोध केला जात आहे. तसेच, गद्दार आणि फुटीर आमदारा असे म्हटले जात असून, शिवसेनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच डोंबिवलीतील शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेत शिवसेनेचे कार्यकर्ते आणि शिंदे गटाचे समर्थक यांच्यात मोठा वाद झाल्याची माहिती समोर येत आहे. (Cm eknath shinde supporters and uddhav thackeray shivsainiks fight in dombivli shiv sena branch)

नेमके काय घडले?

डोंबिवलीच्या शिवसेनेच्या शाखेतील भिंतीवरती आनंद दिघे यांच्यासह शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला आहे. त्यांच्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पूत्र आणि शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांचा फोटो लावण्यात आला आहे. या फोटोंमध्ये शिंदेंच्या समर्थकांनी एकनाथ शिंदे यांचा फोटो लावत होते. हे पाहताच शिंदे समर्थक आणि शिवसैनिक यांच्यात राडा झाला. काही वेळ कार्यकर्त्यांमध्ये हमरातुमरी झाल्याचे समजते.

एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसैनिक चांगले आक्रमक झाले आहेत. अशातच डोंबिवलीतील झालेल्या वादामुळे भविष्यकाळात हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय, शिवसेना नेमकी कोणाची असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फुट पडल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच, आता दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये आक्रमक पणा दिसत आहे. याशिवाय, शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या भागातून म्हणजेच मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, कोकण या भागात एकनाथ शिंदे यांना मोठ्या प्रमाणात समर्थन मिळते आहे. त्यामुळे या भागात एकनाथ शिंदे यांची ताकद मोठी वाढली आहे.


हेही वाचा – शिंदे सरकारचं मंत्रिमंडळ अस्तित्वात नसतानाही तब्बल ७४९ शासन निर्णय जारी

First Published on: August 2, 2022 4:50 PM
Exit mobile version