समृद्धीच्या ८० किमी रस्त्याचे मुख्यमंत्री करणार उद्घाटन; शिर्डी ते घोटीपर्यंतचा मार्ग होणार खुला

समृद्धीच्या ८० किमी रस्त्याचे मुख्यमंत्री करणार उद्घाटन; शिर्डी ते घोटीपर्यंतचा मार्ग होणार खुला

 

मुंबईः समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन २६ मे २०२३ रोजी मुख्यंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहेत. दुसरा टप्पा शिर्डी ते घोटीपर्यंत आहे. हा रस्ता ८० किमीचा आहे. हे अंतर ४० ते ४५ मिनिटांत पूर्ण करता येणार आहे.

मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. एकूण ७०१ किमीचा हा मार्ग आहे. यातील पहिला ५०१ किमाचा टप्पा सुरु झाला आहे. याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी हस्ते करण्यात आले होते. पुढील शिर्डी ते भरवीरपर्यंतच्या ८० किमी रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. हे अंतर ४० ते ४५ मिनिटांत पूर्ण करता येणार आहे. तर भरवीर ते नागपूर अंतर सहा तासांत पूर्ण करता येणार आहे.

शिर्डी ते भिवंडी या सर्वात महत्त्वाच्या टप्प्याचं काम अजून सुरु आहे. या मार्गातील सिन्नर ते कसारापर्यंत १२ बोगदे आणि छोट्या पुलांच काम सुरु आहे. भिवंडीजवळील आमने गाव हा शेवटचा टप्पा डिसेंबर पर्यंत खुला होणार आहे. त्यानंंतरच समृद्धी महामार्ग शंभर टक्के सुरु होईल.

गेल्या वर्षी ११ डिसेंबरला समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. हा भारतातील सर्वात लांब एक्सप्रेस मार्गांपैकी एक आहे, जो महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमधून आणि अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक या प्रमुख शहरी भागांमधून जातो. समृद्धी महामार्ग महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी गेम चेंजर ठरेल. हा एक्स्प्रेस वे आसपासच्या इतर 14 जिल्ह्यांचा संपर्क सुधारण्यास मदत करेल, असे पंतप्रधान कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे.  विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या प्रदेशांसह राज्यातील सुमारे 24 जिल्ह्यांचा विकास होण्यास मदत होणार आहे.

भव्य अशा या महामार्गाचे उद्घाटन झाल्यानंतर येथे अपघाताचे सत्र सुरु झाले. हे अपघात रोखण्यासाठी येथे वेग नियंत्रक बसवण्यात आले आहेत. या अपघातांचे प्रमुख कारण संमोहन असल्याचा तर्कही लावण्यात आला आहे.

First Published on: May 22, 2023 5:53 PM
Exit mobile version