CM कुटूंब-निकटवर्तीय covid-19 पॉझिटीव्ह, मुख्यमंत्र्यांनीही केली कोरोना चाचणी, कॅबिनेटला VC द्वारे हजेरी

CM कुटूंब-निकटवर्तीय covid-19 पॉझिटीव्ह, मुख्यमंत्र्यांनीही केली कोरोना चाचणी, कॅबिनेटला VC द्वारे हजेरी

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्र्यांचे कोरोना पॉझिटीव्ह होण्याचे सत्र एकीकडे थांबत नाहीए, पण दुसरीकडे आता उद्धव ठाकरे यांच्या कुटूंबातील व्यक्ती आणि नजीकच्या अधिकाऱ्यांनाच कोरोनाने विळखा घातला आहे. उद्धव ठाकरे यांच्या कुटूंबातील दोघांनाच आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. आदित्य ठाकरे यांना काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाल्याचे त्यांनी ट्विट केले होते. तर त्यापाठोपाठ मंगळवारी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. उद्धव ठाकरे यांचे सल्लागार राहिलेले अजोय मेहता यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांनीही सावधानात्मक पवित्रा घेत आपली कोरोनाची चाचणी केली आहे. त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल सायंकाळपर्यंत येणे अपेक्षित आहे. बुधवारच्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीलाही उद्धव ठाकरेंनी व्हिडिओ कॉन्फरन्सने हजेरी लावणे पसंत केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच पाणी फाऊंडेशनच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या हजेरीनंतरच आता आमिर खानही कोरोना पॉझिटीव्ह झाल्याची बातमी समोर आली आहे. (CM uddhav thacekray did covid-19 test, joined maharashtra cabinet ministry meeting via video conference)

आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटर हॅण्डलवरून दिली होती. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांना कोरोनाची चाचणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले होते. त्यापाठोपाठच आता मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनाही मंगळवारी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर बॉलिवुड अभिनेता आमीर खान यानेही कोरोनाची लागण झाल्याची माहिती शेअर केली आहे. मुख्यमंत्र्यांचे सल्लागार राहिलेल्या अजोय मेहता यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे कुटूंबीय आणि निकटवर्तीय अशा सगळ्यांनाच कोरोनाची लागण गेल्या अल्पावधीतच झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या मंत्रीमंडळात याआधीच आरोग्य मंत्र्यांपासून ते उपमुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांनाच कोरोनाची लागण होऊन गेली आहे. तसेच सामाजिक न्यायमंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांना कोरोनाची लस घेतल्यानंतरही दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे.

ठाकरे सरकारमध्ये कोरोना पॉझिटीव्ह झालेले मंत्री

राजेंद्र शिंगणे – अन्न, औषध प्रशासन
जितेंद्र आव्हाड – गृहनिर्माण
राजेश टोपे – सार्वजनिक आरोग्य
छगन भुजबळ – अन्न व नागरी प्रशासन
एकनाथ शिंदे – नगरविकास
अजित पवार – उपमुख्यमंत्री
जयंत पाटील – जलसंपदा
उदय सामंत – उच्च व तंत्रशिक्षण
दादाजी भुसे – कृषी
अनिल परब – परिवहन
अब्दुल सत्तार – (राज्यमंत्री) महसूल, ग्रामविकास, बंदरे
धनंजय मुंडे – सामाजिक न्याय विभाग
दिलीप वळसे पाटील – कामगार, राज्य उत्पादन शुल्क
अनिल देशमुख – गृहमंत्री
हसन मुश्रीफ – ग्रामविकास
बाळासाहेब थोरात – महसूल विभाग
संजय बनसोडे – राज्यमंत्री (पर्यावरण, पाणीपुरवठा)
प्राजक्त तनपुरे – राज्यमंत्री (उच्च, तंत्रशिक्षण, ऊर्जा)
वर्षा गायकवाड – शिक्षण
सुनिल केदार – दुग्धविकास, पशुसंवर्धन
नितीन राऊत – ऊर्जामंत्री
अस्लम शेख – वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय
सतेज पाटील – गृहनिर्माण (राज्यमंत्री)
विश्वजित कदम – सहकार, कृषी
बच्चू कडू – जलसंपदा, शालेय शिक्षण


 

First Published on: March 24, 2021 4:23 PM
Exit mobile version