पुढचे २० दिवस महत्त्वाचे असतील – उद्धव ठाकरे

पुढचे २० दिवस महत्त्वाचे असतील – उद्धव ठाकरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशाला संबोधत एक महत्त्वाची घोषणा केली. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय जाहिर केला आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मंगळवारी मध्यरात्रीपासून २१ दिवसांसाठी देश लॉकडाऊन करण्यात येणार आहे. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी राज्याला संबोधले आहे. माझे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलणे झाले. महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले जे नियम आहेत ते तसेच राहतील. जीवनावश्यक सोयी व सुविधा सुरूच राहतील. कोणीही गोंधळू नये, घाबरु नये आणि रस्त्यावर, दुकानात बाजारपेठेत गर्दी करू नये,” असे आवाहन केले आहे.

घाबरुन जाउ नका, गोंधळ नको, असे आवाहन केले आहे. विनाकारण घरा बाहेर पडू नका. यासह करोना संदर्भात माहितीसाठी चॅटबॉट सुरु करण्यात आले आहे. +91 2026 1273 94 हा नवा नंबर सुरु करण्यात आला आहे. सध्या इंग्रजीमध्ये माहिती देण्यात येत आहे. लवकरच मराठीमध्ये आणू, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

First Published on: March 24, 2020 10:54 PM
Exit mobile version