हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवाच – मुख्यमंत्री

हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवाच – मुख्यमंत्री

उद्धव ठाकरे यांचा इशारा

‘तुमच्यात हिम्मत असेल तर हे सरकार पाडून दाखवाच’, असे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपला केले आहे. जळगाव येथील मुक्ताईनगर येथे महाविकास आघाडीच्या मेळाव्यात ते बोलत होते. मुक्ताईनगर येथे पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे प्रथमच जिल्ह्यात आले होते, त्यावेळी त्यांनी घेण्यात आलेल्या मेळाव्यात टीकास्त्र सोडले.

एकनाथ खडसे यांनाही टोला

मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात एकनाथ खडसे यांनाही टोला लगावला आहे. मुक्ताई नगर मुक्त झाले आहे. कुणापासून ते तुम्हाला चांगलंच माहित आहे. तुम्हीच त्यांना बाजूला केले आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र, त्यानंतर भाजपाकडून सातत्याने महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जाते. हे तीन पक्षांचे सरकार म्हणजे ऑटो रिक्षा आहे. हे सरकार फार काळ चालणार नाही. सरकारविरोधात आम्ही ऑपरेशन लोटस राबवणार, असे भाजपा नेत्यांकडून म्हटले गेले आहे. या सगळ्या टीकेला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उत्तर दिले.

…पुन्हा हिंमत केली तर पुन्हा लोटू

‘आम्ही एकत्र आहोत, मजबूत आहोत’, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. तसेच भाजपकडून एप्रिलनंतर ऑपरेशन लोटस राबविणार असल्याचे सांगितले जात आहे. ‘तुम्ही काय ऑपरेश लोटस राबविणार, तुम्हाला जनतेने लोटले, पुन्हा हिंमत केली तर पुन्हा लोटू’, असा हल्लाबोल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे.


हेही वाचा – अनेक लोक आपल्या भूमिका सोडून सत्तेत आले


First Published on: February 15, 2020 5:39 PM
Exit mobile version