कोरोनामुळे राज्यातील निवडणुका ३ महिने पुढे ढकलल्या; मुख्यमंत्र्यांचा निर्णय

कोरोनामुळे राज्यातील निवडणुका ३ महिने पुढे ढकलल्या; मुख्यमंत्र्यांचा निर्णय

उद्धव ठाकरे

भारतात सर्वाधिक कोरोनाबाधित महाराष्ट्रात आढळले असून दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी राज्य सरकारने अनेक उपाययोजना केल्या. अशातच आता राज्य सरकारने महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक ३ महिन्यांकरिता पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

गुरुवारी महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत नगराध्यक्ष आणि उपमहापौरपदाची निवडणूक पुढे ३ महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. राज्यातील यंत्रणा आणि मंत्री सध्या कोरोनाच्या लढाईत व्यस्त आहेत. यावेळी जर निवडणुका लागल्या तर राजकीय पक्षांना आणि नेत्यांना निवडणुकीच्या कामाला वेळ द्यावा लागू शकतो. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

नगरपालिका नियमानुसार १ मे पुर्वी या निवडणुका व्हायला हव्या होत्या. मात्र कोरोनाच्या संकटामुळे त्यावेळी त्या ३ महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

 

First Published on: July 23, 2020 11:35 PM
Exit mobile version