महाराष्ट्रात गांजा, चरसचा व्यापार, असेच जगात चित्र निर्माण केले जातेय- मुख्यमंत्री

महाराष्ट्रात गांजा, चरसचा व्यापार, असेच जगात चित्र निर्माण केले जातेय- मुख्यमंत्री

महाराष्ट्रात केंद्रिय यंत्रणांचे धाडसत्र आणि कारवाया याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात मत मांडले. महाराष्ट्राची विविध माध्यमातून प्रतिमा मलिन करणाऱ्या प्रयत्नांवरही त्यांनी हल्लाबोल केला. त्याचवेळी महाराष्ट्र पोलिसांवरही विश्वास दाखवायला ते विसरले नाहीत. एकुणच केंद्रीय निधीच्या निमित्ताने गुजरातला मिळालेले झुकते माप या विषयावरही त्यांनी टीका केली.

जणू काही संपूर्ण जगात महाराष्ट्रात गांजा, चरसचा व्यापार सुरु आहे, असे एक चित्र उभे करायचा प्रयत्न सध्या केंद्राकडून सुरू आहे. आपल्याकडे असलेल्या तुळशी आणि वृंदावन जाऊन तिथे गांजांची वृंदावने झालीत की काय असे चित्र महाराष्ट्राच जगात निर्माण केले जात आहे. का करत आहात नतद्रष्टपणा ? केवळ महाराष्ट्रातच संपवताय अस नाही. कोट्यावधींचा गांजा मुंद्रा येथे पकडला. आपले पोलिस काहीच करत नाही असे नाही. हे चिमूटभर गांजा हुंगत असतानाच माझ्या पोलिसांनी दीडशे कोटी रूपयांची ड्रग्ज मुंबईत जप्ते केले. कोणी तरी एक सेलिब्रिटी घ्यायचा आणि गांजा पकडला म्हणून ढोलकी बडवायची, फोटो घ्यायचे हे सुरू आहे. तुम्ही चिमूटभर गांजा हुंगत आहात. कुठे हुंगायचं तिकडे हुंगा. पण माझ्या पोलिसांचं शौर्य कमी आहे. की सर्वच माफिया झालेत ? असाही सवाल त्यांनी केला. मुंद्रा अदानी बंदर कुठे येते? हे दहा ग्रॅम शोधणारे यांनी लक्षात घ्यावे. महाराष्ट्रात दीडशे कोटी पोलीसांनी जप्त केले. उगाच महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करू नका असेही ते म्हणाले.

वाचा आणि थंड बसा

कॅगने गुजरातच्या निधीबाबत ताशेरे ओढले आहेत. तर केंद्रीय मंत्री सोनवालचा निधी गुजरातला वळवण्याचा फतवा काढला होता. माहिती अधिकारात अनेक गैरप्रकार उघड झाल्याचेही ते म्हणाले. गुजरातला दहा हजार कोटी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानासाठी दिले. कोविडसाठी निधी केंद्राकडे वळविण्यात आला. केवळ महाराष्ट्रातील जनतेच्या घामाच्या पैशातूनच हा लढा लढलोय असेही ते म्हणाले. देशाचा ७५ टक्के सीएसआर निधी एका राज्याकडे वळवला. दुसरे राज्य या देशाचे घटक नाहीए ? सीएसआरच्या फंडातून कोट्याधी रूपयांच्या निधीची खिरापत वाटल्याची गंभीर बाब समोर आली आहे. वाचा आणि थंड बसा असे मुख्यमंत्री म्हणाले.


 

First Published on: October 15, 2021 8:59 PM
Exit mobile version