कार आणि सरकार दोन्हीही सुरळीत सुरु; कुणीही चिंता करु नये – मुख्यमंत्री

कार आणि सरकार दोन्हीही सुरळीत सुरु; कुणीही चिंता करु नये – मुख्यमंत्री

राज्यातील सरकारचं स्टेअरिंग कोणाच्या हातात आहे, यावरुन चर्चा सुरु आहे. यावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कार आणि सरकार दोन्हीही सुरळीत सुरु आहे असं म्हटलं आहे. लोकांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास हे माझं बळ आहे. स्टेअरिंग कुणाच्या हाती? पुढे कोण बसलं आहे? मागे कोण बसलं आहे? हे महत्त्वाचं नाही. आमचं सरकार समन्वयाने सुरु आहे, असं एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात त्यांनी म्हटलं.

सध्या राज्य सरकारबद्दल ज्यावेळी चर्चा होते. त्यावेळी नेहमी या सरकारचं स्टेअरिंग कोणाच्या हाती आहे, याबाबत सर्वाधिक चर्चा रंगलेल्या दिसतात. तुम्हाला काय वाटतं स्टेअरिंग कोणाच्या हातात आहे. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, कार आणि सरकार दोन्हीही सुरळीत सुरु आहेत. आम्ही सध्या कार आणि सरकार दोन्ही चालवत आहोत. सर्वजण मिळून काम करत आहोत. आरोप सगळ्यांवर केले जातात. बोलणारे खूप लोक आहेत मी कुणाचाही पर्वा करत नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र आहोत. आमच्या नात्याची कुणीही चिंता करु नये. बाळासाहेब ठाकरे भाजपाला काय म्हणायचे हे सगळ्यांना ठाऊक आहे असंही ते म्हणाले.

भाजपसोबत आमचा घटस्फोट झाला आणि त्याची कारणं सगळ्यांना ठाऊक आहेत. भाजपसोबत आम्ही तीस वर्षे होतो. पण त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला नाही पण गेली ३० वर्षे काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्याविरोधात लढलो त्यांनी मात्र माझ्यावर विश्वास दाखवला. माझ्यासाठी हे महत्त्वाचं आहे. महाविकास आघाडीचं सरकार हे किमान समान कार्यक्रमावर सुरु असून या सरकारला कोणताही धोका नाही. माझ्या स्वार्थासाठी मी खुर्चीवर बसलेलो नाही तर लोकांच्या हितासाठी खुर्चीवर बसलो, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.


हेही वाचा – देवेंद्र फडणवीसांना WHO मार्गदर्शनासाठी बोलवतील; मुख्यमंत्र्यांची ठाकरी शैलीत टीका


 

First Published on: July 31, 2020 11:31 PM
Exit mobile version