‘आम्ही पोकळ पॅकेज जाहीर करत नाहीत, प्रत्यक्ष काम करतो’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

‘आम्ही पोकळ पॅकेज जाहीर करत नाहीत, प्रत्यक्ष काम करतो’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

“राज्यावरील कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी राज्य सरकार आटोकाट प्रयत्न करत आहे. मात्र काहीजण पॅकेज कधी देणार? असा प्रश्न उपस्थित करत आहेत. आजपर्यंत लाखो कोटींचे पॅकेज वाटले गेले आहेत. हे पॅकेज वरतून चांगली दिसतात उघडून पाहिल्यावर आत काहीच नसते. महाविकास आघाडीचे सरकार अशा पोकळ घोषणा करणारे नाही”, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना लगावला आहे. दोन दिवसांपूर्वी राज्यातील विरोधकांनी पॅकेज जाहीर करावे म्हणून राज्य सरकारच्या विरोधात महाराष्ट्र बचाव आंदोलन पुकारले होते.

उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हमध्ये बोलताना सांगितले की, “केंद्र सरकारचे आम्ही धन्यवाद मानतो त्यांनी केशरी कार्ड नसलेल्यांनाही धान्य वाटप करण्याची योजना आणली. राज्य सरकार देखील शिवभोजन थाळीच्या माध्यमातून लाखो लोकांना अन्न देत आहोत. यात कोणते आले पॅकेज? रेशन कार्ड नसलेल्यांना धान्य देत आहोत. त्याप्रमाणे रेशन कार्ड नसलेल्यांना महात्मा जोतीराव फुले योजनेद्वारे नोंदणीकृत हॉस्पिटलमधून सर्व रुग्णांना मोफत उपचार दिले जाणार आहेत. यासाठी कोणते पॅकेज आहे? याची आम्ही जाहीरात नाही केली, तर प्रत्यक्ष काम करत आहोत.”

उद्धव ठाकरे यांनी याबाबतीत उपस्थित केलेले मुद्दे –

साडे पाच ते सहा लाख परप्रांतिय मजुरांची आपण जेवणाची सोय केली. पण त्याचे पॅकेज आम्ही जाहीर केले नाही.

जेव्हा परप्रांतीय मजुरांना महाराष्ट्रात राहायचे नव्हते. त्यावेळी आम्ही केंद्राला रेल्वे सुरु करण्याची विनंती केली होती. मात्र तेव्हा ती मागणी मान्य झाली नाही. जेव्हा कामगाक चालत निघाले, तेव्हा केंद्र सरकारचे डोळे उघडले गेले.

४८१ ट्रेन राज्य सरकारने सोडलेल्या आहेत. राज्य सरकारने ८५ कोटी रुपये मजुरांच्या भाड्यापोटी दिले आहेत.

आपण मजुरांची व्यवस्थित नोंदणी केलेली आहे, सोय केलेली आहे. त्यामुळे हे मजूर त्यांच्या राज्यात गेल्यानंतर महाराष्ट्र सरकारची जय करत आहेत.

एसटीने सुद्धा फार महत्त्वाचे काम केले आहे. रस्त्यावरून चालत जाणाऱ्या लोकांना एसटीने पिकअप करुन त्यांना इच्छित स्थळी सोडले आहे.

५ मे ते २३ मे पर्यंत एसटीच्या ३२ हजार फेऱ्या झालेल्या आहेत. ३ लाख ८० मजुरांना आपण एसटीने रेल्वे स्टेशन किंवा त्यांच्या राज्यात सोडले आहे. आतापर्यंत ७५ कोटी यासाठी खर्च केले आहेत.

 

First Published on: May 24, 2020 2:34 PM
Exit mobile version