मुख्यमंत्र्यांंच्या हेलिकॉप्टरचा ‘राजभवन हेलिपॅड’ला बायपास

मुख्यमंत्र्यांंच्या हेलिकॉप्टरचा ‘राजभवन हेलिपॅड’ला बायपास

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील मानापमान नाट्यातील आणखी एक एपिसोड शुक्रवारी पहायला मिळाला. मुख्यमंत्र्यांच्या नियोजित पालघर दौर्‍यासाठी राजभवनाऐवजी थेट महालक्ष्मी रेसकोर्सच्या हेलिपॅडवरून प्रवासाची सुरूवात करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. राजभवनातील हेलिपॅडचा वापर करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सोयीस्कररीत्या टाळले.

आता यापुढे कोणत्याही कार्यक्रमाला जाण्यासाठी सोयीस्कर असलेले राजभवनचे हेलिपॅड टाळणे मुख्यमंत्र्यांना शक्य होणार नाही. त्यामुळे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यातील दरी आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांना वर्षा बंगल्याजवळील सोयीचा असा दक्षिण मुंबईतील हेलिपॅडचा वापर करणे शक्य होते. मात्र गुरूवारी राज्यपालांच्या उत्तराखंड दौर्‍यामुळे घडलेले नाट्य पाहता राजभवनातून प्रवासाला मुख्यमंत्र्यांनी सोयीस्कररीत्या बगल दिल्याचे समोर आले आहे.

महालक्ष्मी रेसकोर्सचा वापर करत मुख्यमंत्री सकाळीच पालघरच्या दिशेने हेलिकॉप्टरने रवाना झाले. राज्यपाल कोश्यारी यांना गुरुवारी सकाळी मसुरीच्या कार्यक्रमासाठी जाण्याकरता राज्य सरकारने विमान नाकारत त्यांना विमानातून पायउतार व्हावे लागले होते.

First Published on: February 13, 2021 5:00 AM
Exit mobile version