चक्रीवादळाचे संकट टळल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले ही तर ‘मुंबा देवीचीच कृपा’

चक्रीवादळाचे संकट टळल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले ही तर ‘मुंबा देवीचीच कृपा’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

निसर्ग ‘ चक्री वादळाच्या तडाख्यातून मुंबईसह महाराष्ट्राचे रक्षण करणाऱ्या सगळ्यांचेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभार मानले आहेत. “महाराष्ट्रावर करोनाचे संकट घोंघावत असतानाच चक्री वादळाचा तडाखा बसला. संकट म्हटले तर मोठे होते. पण हे संकट आपण सगळ्यांनी परतवून लावले आहे. जनता आणि प्रशासनाने झूंज दिली. संकटाची तीव्रता कमी केली. दुर्दैवाने दोन जीव अपघातात गेले. कोकणात तसेच इतरत्र नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश दिले आहेत.”

मुख्यमंत्री आपल्या संदेशात पुढे म्हणाले की, “मुंबा देवीचीच कृपा मुंबई वर आहे. तशी पंढरपूरच्या विठु माऊलींचे आशीर्वाद आहेत. मुख्य म्हणजे या वादळाला थोपवून सामना करणारे महापालिका अधिकारी, जिल्हा प्रशासन, आपत्कालीन व्यवस्थापन, वैद्यकीय पथके या सगळ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. वृत्तवाहिन्या सुद्धा लोकांना चांगली माहिती देत होत्या. निसर्गा पुढे कोणाचेही चालत नाही. पण संकट काळात महाराष्ट्र एक आहे, खंबीर आहे. हे या वादळात दिसून आले. हीच आपली एकजूट महाराष्ट्राला सर्व संकटातुन बाहेर काढल्या शिवाय राहणार नाही.”

First Published on: June 3, 2020 10:36 PM
Exit mobile version