मुख्यमंत्री आज राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची यादी राज्यपालांना सुपूर्द करणार

मुख्यमंत्री आज राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची यादी राज्यपालांना सुपूर्द करणार

प्रातिनिधीक फोटो

राज्यपाल नियूक्त १२ सदस्यांच्या निवडीसाठीचा प्रस्ताव राज्य सरकार आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवणार आहे. या सदस्यांच्या निवडीमध्ये राज्यपाल काटेकोर निकषांचे पालन करणार असल्याची शक्यता असल्याने राज्य सरकारसमोर मोठे आव्हान होते. दरम्यान, या सदस्यांच्या नियूक्तीसाठी तिन्ही पक्षांमध्ये स्पर्धा देखील झाली. या पार्श्वभूमीवर निश्चित झालेल्या सदस्यांची नावे विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात आली आहेत. नावे निकषात बसवण्याची कसरत राज्य सरकारला करावी लागली आहे. सोमवारी (२ नोव्हेंबर) राज्यपालांकडे प्रस्ताव गेल्यानंतर राज्यपाल कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

विधान परिषदेवर नियुक्त करण्यासाठी बारा नावे ठरल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी दिली. मात्र, ही नावे गुपित आहेत ती फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच माहिती आहेत, असे सांगितले. त्यामुळे आता राज्यपालांना दिलेल्या बंद लिफाफ्यात कोणती नावे आहेत? याकडे आता सर्वांचे लक्ष आहे. गेले काही दिवस राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष सुरु आहे. त्यामुळे राज्य सरकारने दिलेल्या नावांना राज्यपाल पसंती देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

First Published on: November 2, 2020 10:16 AM
Exit mobile version