उद्यापासून राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांवर बंदी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

उद्यापासून राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांवर बंदी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

'मिशन ऑक्सिजन' स्वावलंबनातून राज्याला स्वयंपूर्ण करणार - मुख्यमंत्री

राज्यात ९ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण पूर्ण झालं आहे. त्यामुळे माझं इतर कोव्हिड योद्धांना आवाहन आहे की त्यांनी लवकरात लवकर लस टोचून घ्यावी. बाकीच्यांनाही लसीकरण टप्प्याटप्याने होईल, दरम्यान कोरोना विरोधात लढण्यासाठी मास्क हेचं आपलं मुख्य शस्त्र असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आजच्या लाईव्हमधून स्पष्ट केलं आहे. त्याचप्रमाणे गर्दीच्या ठिकाणी रोख लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कठोर निर्बंध लावले आहेत.

याविषयी बोलताना त्यांनी सर्व सामाजिक, धार्मिक, आंदोलनं, यात्रा यांवर पूर्णपणे बंदी असल्याचे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे उद्यापासून मिरवणूका, आंदोलने, यात्रांवर बंदी असणार आहे. तसेच लग्न समारंभांवरही निर्बंध लादले आहे. यावर बोलताना त्यांनी सरकारी नियम मोडलेले दिसले तर हॉलच्या मालकावर गुन्हा दाखल होणार असल्याचे स्पष्ट केले. तर मास्क नाही वापरला तर दंड आकारला जाणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच अर्थचक्राला गती देत असतानाच कोरोनाचं संकट आलं. लॉकडाऊन करायचा का हाच तर मुख्य विषय. त्यामुळे लॉकडाऊन करायचा का? हा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय, लॉकडाऊन करायचा का मी पुढचे आठ दिवस पाहणार. ज्यांना नकोय ते मास्क घालून फिरतील, हवाय ते विना मास्क फिरतील, मास्क घाला, लॉकडाऊन टाळा असेही ते म्हणाले.


 

First Published on: February 21, 2021 7:49 PM
Exit mobile version