टोलवसुलीच्या चौकशीसाठी सीबीआयला पत्र

टोलवसुलीच्या चौकशीसाठी सीबीआयला पत्र

पुणे-सातारा मार्गावरील रिलायन्स इंफ्रास्ट्रक्चरकडून जी टोलवसुली केली जात आहे, ती बेकायदेशीर व नियमांचे उल्लंघन करून असल्याची तक्रार, आरटीआय कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी सीबीआयकडे केली होती. त्या आधारावर आता सीबीआयने राज्य सरकारला पुणे-सातारा टोलनाक्याची चौकशी करण्याची परवानगी द्या, असे म्हणत पत्र पाठवले आहे.

१ जानेवारी २०१६ पासून रिलायन्स इंफ्रास्ट्रक्चर पुणे-सातारा मार्गावर जी टोलवसुली करत आहे ती बेकायदेशीर आणि नियमांचे उल्लंघन करून आहे. सीबीआयने त्यावर प्राथमिक चौकशी केली. नियमात बदल झाल्याने सीबीआयने गुन्हा नोंद करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी मागितली आहे.

First Published on: August 8, 2021 10:46 PM
Exit mobile version