लवकरच सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार

लवकरच सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार

लवकरच सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार

कोरोनामुळे स्थिगित केलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता सुकर झाला आहे. कोरोनामुळे राज्यातील सर्वच निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. दरम्यान, कोरोनाचं संकट थोडं कमी झाल्यानंतर राज्यातील विधानपरिषदेच्या, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. त्याच पाठोपाठ आता लवकरच सहकारी संस्थांच्या निवडणुका होतील. त्याबाबतचे आदेश शासनाने दिले आहेत.

सहकारी संस्थांच्या निवडणुकीवरील स्थगिती मागे घेतल्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँका, साखर कारखान्यांसह सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग सुकर झाला आहे.४७ हजार २७६ सहकारी संस्थांच्या निवडणुका गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या आहेत. निवडणुकीला ३१ मार्चपर्यंत स्थगिती देण्यात आली होती, ती आता मागे घेण्यात आली आहे. राज्यातील पार पडलेल्या विधान परिषदांच्या निवडणुका आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुका तसंच राज्यातील लोकप्रतिनिधी व सहकारी संस्थांचे पदाधिकारी यांनी सहकारी संस्थांची निवडणुक प्रक्रिया सुरु करण्याबाबत शासनाला विनंती केली होती. या विनंतीचा विचार करुन शासनाने स्थानिक संस्थांच्या निवडणुका लवकरच घ्याव्यात असे आदेश दिले आहेत.

शासनाने १६ जानेवारीचा आदेश रद्द करुन ज्या टप्प्यावर सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित करण्यात आलेल्या होत्या त्या टप्प्यापासून, कोरोनाच्या संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचं काटेकोरपणे पालन करुन निवडणुका घ्याव्यात असा आदेश शासनाने दिला आहे. शासनाच्या निर्णयानंतर आता सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल लवकरच वाजेल.

First Published on: February 2, 2021 6:19 PM
Exit mobile version