जो कोणी भेदभावाला कारणीभूत ठरेल त्याला संपवा; वर्ण आणि जाती व्यवस्थेवर मोहन भागवतांचे मोठे विधान

जो कोणी भेदभावाला कारणीभूत ठरेल त्याला संपवा; वर्ण आणि जाती व्यवस्थेवर मोहन भागवतांचे मोठे विधान

नागपूर : आरएसएस अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी जाती व्यवस्थेवर मोठे भाष्य केले असून, वर्ण आणि जाती व्यवस्था या भूतकाळातील गोष्टी आहेत आणि त्या आता विसरल्या पाहिजेत, असे ते म्हणालेत. शुक्रवारी नागपुरात एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याला मोहन भागवत यांनी उपस्थिती लावली होती, त्यावेळी ते बोलत होते. जाती व्यवस्थेला आता काही महत्त्व नाही. वर्ण, जात या संकल्पना पूर्णपणे सोडून दिल्या पाहिजेत, असेही त्यांनी अधोरेखित केले.

खरं तर डॉ. मदन कुलकर्णी आणि डॉ. रेणुका बोकारे यांनी लिहिलेल्या ‘वज्रसूची तुंक’ या पुस्तकाचा दाखला देत संघप्रमुख मोहन भागवत म्हणाले की, सामाजिक समता हा भारतीय परंपरेचा भाग होता, पण त्याचा विसर पडलाय आणि त्याचे घातक परिणाम समोर आले आहेत. मागच्या पिढ्यांनी काही चुका केल्या आहेत आणि भारतही त्याला अपवाद नाही, असेही ते म्हणाले.

वर्ण आणि जाती व्यवस्था मुळात भेदभाव करत नसल्याचा दावाही त्यांनी केलाय. आज जर कोणाला याबद्दल विचारले तर त्याचे उत्तर असे असावे की, ‘हा भूतकाळ आहे, तो विसरला पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं आहे.


आरएसएस प्रमुख भागवत म्हणाले, “त्या चुका मान्य करायला हरकत नसावी आणि जर तुम्हाला वाटत असेल की, आमच्या पूर्वजांनी चुका केल्या म्हणजे ते हीन दर्जाचे असतील, तसे होणार नाही, कारण प्रत्येकाच्या पूर्वजांनी काही ना काही चुका केल्या आहेत.” आरएसएसच्या मुख्यालयात विजयादशमीच्या मुहूर्तावर भागवत म्हणाले होते की, आपल्या मित्रांमध्ये सर्व जाती आणि आर्थिक समुदायाचे लोक असावेत, जेणेकरून समाजात अधिक समानता आणता येईल.


हेही वाचाः सीएनजी-पीएनजीच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

First Published on: October 8, 2022 9:28 AM
Exit mobile version