Congress MLA : काँग्रेसच्या नाराज आमदारांचं सोनिया गांधींना पत्र, सोनिया गांधींची घेणार भेट

Congress MLA : काँग्रेसच्या नाराज आमदारांचं सोनिया गांधींना पत्र, सोनिया गांधींची घेणार भेट

महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाच्या आमदारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. काँग्रेसच्या २५ आमदारांनी काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं आहे. आमदारांनी सोनिया गांधींकडे भेटीसाठी वेळ मागितली आहे. काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली हे नाराज आमदार एकवटले आहेत. त्यामुळे पुढील महिन्यात हे नाराज आमदार सोनिया गांधी यांची भेट घेणार आहे.

राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलं आहे. शिवसेना राष्ट्रवादी पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे पाहिलं असता काँग्रेसचे आमदारही नाराज असल्याने त्यांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे वेळ मागितली आहे. आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या नाराज आमदारांनी सोनिया गांधींना पत्र लिहिलं आहे. या पत्रावर २० आमदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर तिन्ही पक्षांमध्ये खातेवाटप, जबाबदाऱ्यांचे वाटप झाले होते. त्यानुसार, काँग्रेसकडे विधानसभा अध्यक्षपद आले होते. नाना पटोले यांची विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र, अर्थसंकल्पीय अधिवेशन पूर्ण झाल्यानंतरही विधानसभा अध्यक्षांची निवड झालेली नाही. त्याचप्रमाणे महामंडळाच्या नियुक्त्या रखडल्याने सत्तेत कमी वाटा असल्याची खंत काँग्रेसमध्ये व्यक्त होत असल्याची चर्चा देखील रंगत आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या २५ नाराज आमदारांनी सोनिया गांधींना पत्र लिहून भेटीची वेळ मागितली आहे. यामध्ये आमदार संग्राम थोपटे, प्रणिती शिंदे आणि कुणाल पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसने यापूर्वी देखील नाराजी व्यक्त केली होती. यापूर्वी महसूल मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केली होती. परंतु आता २५ आमदारांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीची वेळ मागितली आहे.


हेही वाचा : मविआ सरकारमध्ये काँग्रेस आमदार नाराज, सोनिया गांधींशी थेट करणार चर्चा


 

First Published on: March 31, 2022 3:46 PM
Exit mobile version