“मोदीजी माफी मांगो” काँग्रेसचे राज्यभरात भाजप कार्यालयासमोर आंदोलन

“मोदीजी माफी मांगो” काँग्रेसचे राज्यभरात भाजप कार्यालयासमोर आंदोलन

"मोदीजी माफी मांगो" काँग्रेसचे राज्यभरात भाजप कार्यालयासमोर आंदोलन

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषण धन्यवाद प्रस्तावावर बोलताना काँग्रेसवर टीका केली आहे. तसेच महाराष्ट्र कोरोनाचा सुपर स्प्रेडर ठरला त्यामुळे देशात कोरोना पसरला असा दावा मोदींनी केला आहे. याविरोधात महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी आंदोलन पुकारले आहे. महाराष्ट्राती भाजप पक्षाच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरु करण्यात आले आहे. मुंबईत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरु करण्यात आले आहे. मोदीजी माफी मांगो अशा घोषणाबाजी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून दिल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना पसरवण्यासाठी काँग्रेसला जबाबदार धरले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्त्वात मुंबईत भाजपच्या कार्यालयांसमोर आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबईत मंत्रालयाजवळील गांधी पुतळ्यापासून काँग्रेसनं आंदोलन सुरु केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान केला आहे. त्यामुळे मोदींनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदीजी माफी मांगो, तानाशाही नही चलेगी अशा घोषणा दिल्या जात आहेत. महाराष्ट्राती भाजप नेत्यांनी मोदींच्या वक्तव्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, देशाचे तुकडे पाडणाऱ्या विचारांचे सरकार देशात बसले आहे. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी देशाला कसं मजबूत करता येईल याविषयी मत मांडले असताना महराष्ट्राला देशात कोरोना वाढवणारे राज्य म्हटल आहे. ज्या राज्याने इथे असलेल्या लोकांना मदत कऱण्याचे काम केले. त्या जनतेचा अपमान करण्याचा अधिकार पंतप्रधानांना दिला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान जनता माफ करणार नाही. मोदी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरु राहणार. प्रत्येक जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करत असून माफी मागितल्याशिवाय आंदोलन मागे घेण्यात येणार नाही असे नाना पटोले म्हणाले.


हेही वाचा : मोदींनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी अन्यथा…, नाना पटोलेंचा इशारा

First Published on: February 9, 2022 12:05 PM
Exit mobile version