पटोलेंविरोधात काँग्रेसमध्ये असंतोष, २४ नेत्यांनी केली ‘ही’ मागणी

पटोलेंविरोधात काँग्रेसमध्ये असंतोष, २४ नेत्यांनी केली ‘ही’ मागणी

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. काँग्रेसमधून अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. आता नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून ​​हटवा, अशी मागणी विदर्भातल्या 24 नेत्यांनी केली आहे. या नेत्यांनी काँग्रेसचे निरीक्षक रमेश चेन्निथला यांची भेट घेतली. त्यांच्याकडे पटोले यांना हटवा आणि शिवाजीराव मोघे यांना प्रदेशाध्यक्ष करा, अशी मागणी करण्यात आली आहे.

काँग्रेस निरीक्षक रमेश चेन्निथला यांची मुंबईत विदर्भातल्या नेत्यांनी भेट घेतली. यावेळी काँग्रेस समितीचे सचिव रहमान खान नायडू, सदस्य प्रदेश काँग्रेस कमिटी प्रकाश मुगदीया, इक्राम हुसैन, सरदार महेंद्र सिंह सलूजा यांच्यासह जवळपास दोन डझन पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी यावेळी पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवा, अशी मागणी केली. तसेच हीच मागणी रायपूर येथे सुरू असलेल्या काँग्रेस अधिवेशनात हायकमांडकडे करणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केल्याचे समजते.

पटोले यांच्यामुळे पारंपारीक मतदार असलेले दलित, मुस्लीम आणि आदिवासी दुरावले आहेत, असा दावा शिवाजीराव मोघेंच्या समर्थकांनी केला आहे. तर नाना पटोले पक्षाच्या बैठकीत कोणाचं ऐकत नाही, असं देखील त्यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून पोलिसांकडून सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल, आव्हाडांनी व्यक्त केला संताप


 

First Published on: February 24, 2023 5:45 PM
Exit mobile version