काँग्रेसला अर्धवेळ नव्हे तर, पूर्णवेळ अध्यक्ष मिळायला हवा, पृथ्वीराज चव्हाण यांचे मत

काँग्रेसला अर्धवेळ नव्हे तर, पूर्णवेळ अध्यक्ष मिळायला हवा, पृथ्वीराज चव्हाण यांचे मत

सातारा – अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून काँग्रेसमधील अंतर्गत वाद बाहेर आला आहे. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षाला पार्ट टाईम नाही तर फुल टाईम अध्यक्ष देण्याची मागणी पक्षश्रष्ठींकडे केली आहे. पक्षाच्या नव्या अध्यक्षाला सर्वांना भेटण्यासाठी भरपूर वेळ असायला हावा, त्याच्यावर दुसरी कोणतीही जाबाबदीरी नको, असे वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे.

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूका पारदर्शक पद्धतीने झाल्या पाहिजेत –

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत G-23 गटाकडून खासदार शशी थरुर आणि गांधी गटाकडून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे नाव जवळपास निश्चीत झाल्याची माहिती आहे. याबाबत बोलताना काँग्रेस पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष मिळायला हवा ही आमची प्रमुख मागणी असल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. या सोबत याशिवाय अध्यक्षपदाच्या निवडणुका पारदर्शीपणे पार पडायला हव्यात, अशीही मागणी आम्ही शीर्ष नेत्यांकडे केली आहे. दरम्यान अशोक गेहलोत हे सध्या राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदावर आहेत. त्यामुळे पदावर असताना ते अध्यक्षपद स्विकारत असतील तर त्याला आमचा विरोध आहे. आम्हाला हे बिलकूल चालणार नाही. पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष हवा, असे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

असे ठराव कोण पास करतंय ? –

यावेळी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबई कॉंग्रेस कमिटीने पक्षाच्या अध्यक्षपदासाठी राहुल गांधींना पाठिंबा देण्यासाठी पास केलेल्या ठरावावर  टीका केली. यावेळी मुंबईत पक्षाने ठराव पास करण्याची काहीच आवश्यकता नव्हती. पक्षांतर्गत सर्व पदांवर निवडणुका व्हायला हव्यात. असे ठराव कोण पास करतंय?, असा पश्न करत त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर टीका केली.

राहुल गांधी पूर्णवेळ काम करणार असतील तर अडचण नाही –

पक्षाचे अध्यक्षपद स्विकारून राहुल गांधी पूर्णवेळ काम करणार असतील, तर आम्हाला काहीही अडचण नसल्याचे चव्हाण म्हणाले. याशिवाय कॉंग्रेस पक्ष मोदींना हुकुमशहा म्हणतो. मात्र, कॉंग्रेसनेही लोकशाही पद्धतीने चालला पाहिजे. असले ठराव कोण करत आहे. हे मधुसुदन मिस्त्री यांनी स्पष्ट करायला हवे, असा प्रश्न चव्हाण यांनी विचारला.

First Published on: September 24, 2022 3:43 PM
Exit mobile version