अदानी प्रकरणी चुकीचं बोललो नाही, गुगल करा; नोटिशीवर राहुल गांधींची प्रतिक्रिया

अदानी प्रकरणी चुकीचं बोललो नाही, गुगल करा; नोटिशीवर राहुल गांधींची प्रतिक्रिया

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत उद्योगपती गौतम अदानी यांच्याविरोधातील हिंडेनबर्ग अहवालावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. यानंतर अनेक राजकीय वाद उफाळून आले. दरम्यान राहुल गांधी यांनी अदानी आणि मोदींविषयी केलेलं विधान नंतर संसदेच्या पटलावरून हटवण्यात आलं, इतकच नाही तर राहुल गांधी यांच्यावर असंसदीय वक्तव्याचा ठपका ठेवत त्यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. याच नोटीसीवर आता राहुल गांधी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपण संसदेत काहीही चुकीचं बोललो नाही, लोक हवे असल्यास गुगलही करुन बघू शकता, अस राहुल गांधी म्हणाले आहेत.

काही दिवसांपूर्वी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी यांच्यावर सभागृहात भाष्य केलं होतं. मी माझा मुद्दा अतिशय शांतपणे आणि नम्रपणे मांडला होता. कोणताही वाईट भाषा वापरलेली नव्हती, माझ्या बाजूने फक्त काही तथ्य मांडली गेली. मी सांगितले की, अदानी पंतप्रधानांसोबत परदेश दौऱ्यावार कसे जायचे आणि नंतर त्यांना मोठे कंत्रात कसे मिळायचे. विमानतळावरील 30 टक्के वाहतूक अदानींद्वारे कशी नियंत्रित केली जाते, असे सांगत राहुल गांधी यांनी आपले भाषण एडिट केल्याचा दावा त्यांनी केला आहे. अदानी आणि अंबानींबद्दल बोलणं हा पंतप्रधानांचा अपमान आहे असे दिसत असल्याचेही राहुल गांधी पुढे म्हणाले.

संसदेतील हटवलेल्या भाषणावर राहुल गांधींनी युक्तीवाद केला की, आता सदनातील एखाद्याच्या भाषणात तथ्य नसेल तर एखादी गोष्ट काढून टाकली जाते. मात्र आपल्या बाजूची सर्व विधानं वस्तूस्थितीच्या आधारे देण्यात आली होती. पंतप्रधान मोदी लोकसभेत आपल्याबद्दल खूप बोलले, पण ते असंसदीय वक्तव्य मानले जात नाही, यावरही राहुल गांधींनी नाराजी व्यक्त केली.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, पंतप्रधान म्हणतात माझे आडनाव गांधी किंवा नेहरू का नाही? म्हणजे पंतप्रधान  थेट माझा अपमान करु शकतात. पण त्यांचे शब्द काढले जात नाहीत. याचा अर्थ सत्य बाहेर येणार नाही असे नाही. भाषणादरम्यान माझा चेहरा आणि पंतप्रधान मोदींचा चेहरा पाहिला असता, ते किती वेळा पाणी प्यायले, हात कसे थरथरत होते, त्यांना वाटते की, ते शक्तीशाली आहेत आणि त्यांना लोकं घाबरती.


अनिल देशमुखांनाही भाजपकडून ऑफर; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

First Published on: February 13, 2023 9:27 PM
Exit mobile version