काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनाने निधन

काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनाने निधन

काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनाने निधन

नांदेडमधील देगलूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे वयाच्या ५५ व्या वर्षी कोरोनामुळे निधन झाले आहे. अंतापूरकर यांच्यावर मुंबईतील बॉम्बे रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. मात्र, उपचारा दरम्यान, त्यांची प्राणज्योत मालवली आहे. रावसाहेब अंतापूरकर यांना सुरुवातीला कोरोनाची लक्षणे जाणू लागली. त्यामुळे त्यांची तपासणी केली असता, त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांना सुरुवातीला नांदेडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती खालवल्यानंतर त्यांना मुंबईतील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

रावसाहेब अशोक चव्हाण यांचे अत्यंत जवळचे सहकारी

रावसाहेब अंतापूरकर हे काँग्रेसचे नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांचे अत्यंत जवळचे सहकारी होते. अशोक चव्हाण यांना अंतापूरकर यांच्या निधनाबाबत कळताच त्यांनी स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिली. त्यात ते म्हणाले, ‘माझे निकटचे सहकारी आणि देगलूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार रावसाबेह अंतापूरकर यांचे निधन झाले असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. तसेच त्यांच्या कुटुंबियांना हे अपरिमित दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो, ही प्रार्थना’, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.


हेही वाचा – Weekend Lockdown:मुंबईसह राज्यातील रस्ते, बाजारपेठा चौकाचौकांमध्ये शुकशुकाट


 

First Published on: April 10, 2021 3:42 PM
Exit mobile version