मोदींची बदनामी करुन राजकीय पोळी भाजण्याचा भाजपचा प्रयत्न, नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर

मोदींची बदनामी करुन राजकीय पोळी भाजण्याचा भाजपचा प्रयत्न, नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर

पंतप्रधान मोदींची बदनामी करुन राजकीय पोळी भाजण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. कोणाचे मानसिक संतुलन बिघडलंय हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीसांना समजले पाहिजे असा पलटवार नाना पटोलेंनी केला आहे. नाना पटोले यांच्या डोक्यावर परिणाम झाला असून त्यांना चांगल्या तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवण्याची विनंती फडणवीसांनी केली होती. यावर नाना पटोलेंनी पलटवार केला आहे. गावगुंड मोदीबाबत केलेलेल्या वक्तव्यावरुनही नाना पटोले यांनी भाजपवर पलटवार केला आहे. भाजप महाराष्ट्रातील राजकीय वातावरण बिघडवण्याचे काम करत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. नाना पटोले यांचे डोके हालले असल्याची टीका फडणवीसांनी केली आहे. यावर डोक कोणाचे हाललं हे माझ्या मित्राला कळाले पाहिजे. मी गावगुंडबाबत बोलतो आणि आमचे मित्र थेट देशाच्या पंतप्रधानांबाबत तुलना करतात. भाजप या निमित्ताने नरेंद्र मोदींची बदनामी करुन महाराष्ट्रात काही दुसरे साध्य करण्याचा प्रयत्न तर करत नाही ना? असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. मी सातत्याने सांगतो आहे की, तो गुंड आहे. तो गुंड सगळ्यांसमोर आला आहे आणि माध्यमांसमोर देखील आला आहे. त्याने अनेकदा वक्तव्य केलं आहे त्यानंतरही गावगुंडाची बाजू घेणारा भाजप आम्ही पाहतो आहे. हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील राजकीय व्यवस्थेतील काळा दिवस आहे. भाजप दुर्भाग्यपूर्ण निर्माण करते आहे ते चुकीचे आहे. महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारात असे कुठेही नाही ते भाजप आणत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

राजकीय वातावरण बिघडवण्याचा भाजपचा प्रयत्न

भाजप खरंच महिलांचा सन्मान करणारा पक्ष असेल तर बेटी बचाओ आणि बेटी पटाओ हे कशाचे स्लोगण आहे. त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा नाही पण खोटं आरोप माझ्यावर लादून राज्यातील राजकीय वातावरण बिघडवण्याचे काम भाजप करत आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. भाजपचे विदर्भात पानीपत झाले आहे त्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडलं आहे. आता दुरपर्यंत त्यांना सत्ता मिळेल असे दिसत नसल्यामुळे नाना पटोलेंना निशाणा केल्यावर आमची काही राजकीय पोळी भाजेल का असा त्यांचा प्रयत्न दिसत असल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे.


हेही वाचा :शिवसेना सत्तेसाठी लाचार ! कॉंग्रेस नेतृत्वाचे बाळासाहेबांच्या जयंतीला एक ट्विटही नाही- देवेंद्र फडणवीस

First Published on: January 24, 2022 4:17 PM
Exit mobile version