कोल्हापूर मनपाच्या महापौरपदी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरिता मोरे

कोल्हापूर मनपाच्या महापौरपदी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरिता मोरे

कोल्हापूर महापालिकेच्या नवनिर्वाचित महापौर सरिता मोरे

कोल्हापूर महापालिकेच्या महापौर निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सरिता मोरे या विराजमान झाल्या आहेत. आज महापौर निवड प्रक्रियेत आघाडीच्या मोरे यांना ४१ तर ताराराणी आघाडीच्या जयश्री जाधव यांना ३३ मते मिळाली. कोल्हापूर महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणूक घेण्यात आली. खुल्या प्रवर्गातील महिला प्रतिनिधीसाठी यावेळी महापौरपद आरक्षित करण्यात आले होते.

महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजप पक्षात चांगलीच चुरस पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी आघाडीच्या उमेदवाराचा विजय व्हावा, यासाठी जोरदार प्रयत्न केला. तर भाजपकडून चद्रंकांत पाटील यांनीही जोर लावला होता. मात्र अखेर काँग्रेस-राष्ट्रवादीने महापालिकेतील महापौर-उपमहापौरमद राखण्यात यश मिळवले आहे.

First Published on: December 10, 2018 1:15 PM
Exit mobile version