शुल्लक कारणावरून तिकीट काउंटरची तोडफोड

शुल्लक कारणावरून तिकीट काउंटरची तोडफोड

शुल्लक कारणावरून तिकीट काउंटरची तोडफोड

उल्हासनगर येथे एका मद्यधुंद रेल्वे प्रवाशाने तिकीट काउंटरवरील क्लर्कशी हुज्जत घालून काउंटरची तोडफोड केली. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या आरोपीचे नाव निरप्पा सोनार असे आहे. तो उल्हासनगर येथे आपल्या नातोवाईकांच्या घरी आला होता. रेल्वे पोलिसांनी आरोपी निरप्पा सोनार याच्याविरुद्ध रेल्वे ऍक्ट १५४, १४५,( ब ) १४६ अन्व्ये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. त्याला १ दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर आज रेल्वे प्रथम वर्ग दंडाधिकारी कळसकर यांच्यासमोर त्याला हजर केले होते. तेव्हा सोनारने त्याचा गुन्हा कबूल केला. सोनारला ५ हजार दंड आकारणी करून जामिनिवर सोडण्यात आले. या प्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे हे करीत आहेत.

काय आहे नेमकं प्रकरण?

गुजरात मधील उमरगा येथे राहणारा निरप्पा सोनार ( ३५ ) हा त्याच्या पत्नीसह उल्हासनगरच्या नातेवाईकाकडे आला होता. तो काल गुरुवारी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास पुन्हा त्याच्या गावी जाण्यास निघाला होता. यावेळी त्याने उल्हासनगर रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील तिकीट काऊंटर क्रमांक ६ येथे बुकिंग क्लर्ककडे २ तिकिटे मागितले. दरम्यान तिकीट दरातील १० रुपयांच्या फरकावरून मद्यधुंद सोनारने क्लार्कशी वाद घातला. नंतर आरडाओरड करून काउंटरच्या काचा फोडल्या. यानंतर येथे एकच गोंधळ उडाला आणि सोनारने तेथून पळ काढला. मात्र नागरिकांनी त्याला पकडून रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले.

First Published on: March 22, 2019 5:42 PM
Exit mobile version