VIDEO : कॉपी बहाद्दरांचा लातूर पॅटर्न

VIDEO : कॉपी बहाद्दरांचा लातूर पॅटर्न

लातूरमध्ये परिक्षा केंद्रावर कॉपी पुरवताना

आज दहावी बोर्ड परिक्षेचा इंग्रजी विषयाचा पेपर होता. इंग्रजी म्हटले की, अवघड वाटणारा विषय आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील अंबुलगा (बुद्रुक) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत दहावीचे परीक्षा केंद्र आले आहे. आज सकाळी ११ वाजता पेपरला सुरुवात झाली. पेपर सुरु झाल्यानंतर पालक आणि मित्र परिवारांनी मोठ्या प्रमाणात कॉपी पुरवण्याचा प्रकार खुलेआमपणाने सुरु होता. कॉपी पुरवण्याचा हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. विशेष बाब शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारातून कॉपी पुरवणारे बिनदिक्कतपणे ये-जा करत होते. यावेळी पोलीस बंदोबस्त असूनही कॉपीला अटकाव झाला नसल्याचे समजते. सदरच्या परिक्षेसाठी दहावी परिक्षा बोर्डाने बैठे पथक भरारी पथकांची स्थापना केली होती. ऐवढे पथके असूनही कॉपी खुले आमपणाने सुरु असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

संपूर्ण राज्याला शिक्षणाचा आदर्श लातूर पॅटर्न देणाऱ्या लातूर जिल्ह्यात पुन्हा एकदा दहावी परीक्षेवेळी जोरदार कॉपी करण्यात आली असल्याचे या व्हिडिओतून उघड झाले आहे. परिक्षा केंद्राच्या मागच्या बाजूला असलेल्या खिडक्यांमधून कॉपी पुरवल्या जात आहेत. पोलीस बंदोबस्त असताना, वर्गात शिक्षक उपस्थित असताना देखील अशा प्रकारच्या कॉपी पुरवल्या जात होत्या. कॉपी केंद्रावर बोर्ड काय कारवाई करणार हा मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

First Published on: March 5, 2019 10:09 PM
Exit mobile version