होळीच्या तोंडावर भारतासाठी ‘व्हायरल’ करोनाचा एलर्ट

होळीच्या तोंडावर भारतासाठी ‘व्हायरल’ करोनाचा एलर्ट

होळीच्या तोंडावर भारतात कोरोना व्हायरसचा एलर्ट व्हायरल

करोना व्हायरसने घातलेल्या धुमाखुळामुळे आता आठवड्यावर येऊन ठेपलेल्या रंगपंचमीच्या सणावरही याचा परिणाम झालेला आहे. यंदाच्या रंगपंचमीच्या सणातील रंगाच्या मार्केटवरही याचा फटका बसायला सुरूवात झाली आहे. रंगांच्या वापराबाबतच आता सोशल मिडियावर मॅसेज व्हायरल होऊ लागले आहेत. होळीचे कलर, फुगे हे सर्व चीनमधूनच भारतात येत असतात. त्यामुळे करोना व्हायरसची लागण भारतात होऊ शकते असा मॅसेज सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. एका दिवसाच्या मजेसाठी आपले आयुष्य धोक्यात घालू नका असेही मॅसेजमध्ये नमुद करण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेच्या नावे ही पोस्ट फिरत आहे. चीनी वस्तुंबाबत पसरलेल्या अफवांमुळे आता लोकल भारतीय बाजारपेठेला मात्र चांगले दिवस आले आहेत.

काय आहे पोस्ट ?

भारतात जो होळीचा सण येत्या काही दिवसांवर येऊन पोहचला आहे, त्यासाठी भारतात रंग, गुलाल आणि मास्क यासारख्या अनेक गोष्टी चीनहून येतात. स्वस्त आणि आकर्षित म्हणून आपण ज्या गोष्टी सणाच्या आनंदासाठी खरेदी करतो अशा गोष्टी चीनच्या करोना ग्रस्त भागातून तयार होऊन येतात. या भागात करोनाच्या व्हायरसने थैमान घातले आहे. तुमच्या यंदाच्या होळीसाठी चीनहून येणाऱ्या रंगाचा वापर करू नका असे आवाहन या निमित्ताने करण्यात आले आहे. या मॅसेजमध्ये जागतिक आरोग्य संघटनेचा हवालाही देण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून करोना व्हायरसबाबत अशी माहिती जाहीर करण्यात आली आहे.

करोना व्हायरससाठी व्हायरल मॅसेज

 

खरं काय ?

कोरोनो व्हायरसबाबत कोणतीही एडव्हायजरी जाहीर करण्यात आलेली नाही. तसेच चीनी वस्तूंच्या खरेदीबाबत अशी कोणतीही एडव्हायजरी जागतिक आरोग्य संघटनेमार्फत जाहीर करण्यात आलेली नाही. जागतिक आरोग्य संघटनेचा खोटा लोगो तसेच भारत सरकारचा खोटा लोगोही यासाठी वापरण्यात आलेला आहे. कोणताही अहवाल किंवा एलर्ट भारत सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेला नाही. तसेच भारत सरकारने याबाबतचा कोणतेही प्रसिद्ध पत्रक जारी केलेले नाही.

चीनी आयातीवर मात्र परिणाम

दरवर्षी चीनी रंगांचा बोलबाला हा भारतीय बाजारपेठेवर असतो. मात्र यंदाच्या रंगपंचमीच्या सणावर मात्र करोनाचे सावट आहे. यंदा मुळातच चीनमधून कमी प्रमाणात रंग, गुलाल, पिचकारी कमी प्रमाणात आली आहे. करोनामुळे ह्या गोष्टी भारतीय बाजारपेठेत दरवर्षीसारख्या उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. दिल्लीपासून ते मुंबईसारख्या शहरात चीनी गोष्टींना धुलिवंदनासाठी मोठी मागणी असते. पण यंदा मात्र हा सगळा स्टॉक कमी प्रमाणत आयात करण्यात आला आहे. स्टॉक मुळातच कमी असल्याने बाजारात या रंगांची, पिचकारीची, गुलालाची अशी सगळीच किंमत वाढली आहे. किंमत वाढल्याने यंदा ग्राहकांकडून अशा वस्तुंची खरेदीही कमी होत आहे. यंदाच्या धुलीवंदनाच्या मार्केटमध्ये सगळ्याच वस्तु या १५ टक्के ते २० टक्के महागल्या आहेत.

First Published on: March 2, 2020 5:22 PM
Exit mobile version