महापालिकेच्या आठ रुग्णालयांसह एकूण १९ रुग्णालयांमध्ये ‘करोना कोविड १९’ची तपासणी

महापालिकेच्या आठ रुग्णालयांसह एकूण १९ रुग्णालयांमध्ये ‘करोना कोविड १९’ची तपासणी

मुंबई महानगरपालिका

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात ‘करोना कोविड १९’च्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सातत्याने सर्वस्तरीय प्रयत्न करत आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून ज्या व्यक्तींना कफ, सर्दी, खोकला, ताप, श्वास घेताना त्रास होणे अशी लक्षणे जाणवत असतील, त्यांना दूरध्वनीद्वारे व घरबसल्या महापालिकेच्या तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन प्राप्त करुन घेणे आता शक्य झाले आहे. यासाठी महापालिकेने ‘०२०-४७०-८५-०-८५’ दूरध्वनी क्रमांकावर सकाळी १० ते सायंकाळी ७ या कालावधीदरम्यान तज्ज्ञ डॉक्टरांचे मोफत मार्गदर्शन देण्याची सुविधा आता सुरू केली आहे.

महापालिका ट्विट

या सुविधेमुळे ‘करोना कोविड १९’ ची लक्षणे वाटत असणाऱ्या नागरिकांना त्यांच्या मनातील शंकेचे निरसन सहजपणे व घरबसल्या करता येणार आहे. या दूरध्वनी मार्गदर्शना दरम्यान दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीची वैद्यकीय चाचणी करणे गरजेचे आहे, असे तज्ञ डॉक्टरांना आढळून आल्यास त्या व्यक्तीला त्याच्या परिसरातील खासगी वैद्यकीय प्रयोगशाळेतून ‘करोना कोविड १९’ ची चाचणी करवून घेण्याचे निर्देशित करण्यात येणार आहे. तसेच या अनुषंगाने आवश्यक तो पाठपुरावा देखील दूरध्वनीद्वारे करण्यात येणार आहे.

दूरध्वनी मार्गदर्शन असो किंवा संबंधित वैद्यकीय चाचणी करवून घेणे असो; या सुविधा महापालिका क्षेत्रातील नागरिकांना घरबसल्या मिळायला हव्यात; यासाठी महापालिका सातत्याने आग्रही व प्रयत्नशील आहे. जेणेकरून नागरिकांना घराच्या बाहेर पडण्याची गरज पडणार नाही. याच प्रयत्नांचा भाग म्हणून महापालिका क्षेत्रातील पाच खाजगी वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये ‘करोना कोविड १९’ ची चाचणी करण्याची सुविधा यापूर्वीच उपलब्ध करून देण्यात आली आहे. या खाजगी वैद्यकीय प्रयोगशाळांची नावे व संपर्क क्रमांक पुढील प्रमाणे आहेत:

१. सबर्बन डायग्नोस्टिक्स : ०२२-६१७०-००१९

२. थायरोकेअर : ९७०२-४६६-३३३

३. मेट्रोपोलीस: ८४२२-८०१-८०१

४. सर एच एन‌ रिलायन्स : ९८२०-०४३-९६६

५. एसआरएल लॅब

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात आता १९ रुग्णालयांमध्ये ‘करोना कोविड १९’ची तपासणी

‘करोना कोविड १९’ या आजाराची तपासणी व उपचार ही सुविधा सुरुवातीला महापालिकेच्या केवळ कस्तुरबा रुग्णालयात उपलब्ध होती. मात्र आता महापालिकेने केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे महापालिका क्षेत्रातील महापालिकेची ८ व खाजगी ११ रुग्णालये; अशा एकूण १९ रुग्णालयांमध्ये तपासणी व उपचार विषयक सुविधा उपलब्ध झाली आहे. या रुग्णालयांची नावे पुढील प्रमाणे:

१. महापालिकेचे ‘केईएम सर्वोपचार रुग्णालय’

२. महापालिकेचे ‘लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालय’

३. महापालिकेचे नायर रुग्णालय

४. महापालिकेचे कूपर रुग्णालय

५. महापालिकेचे ‘हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्राॅमा केअर रुग्णालय

६. महापालिकेचे ‘भाभा रुग्णालय’, वांद्रे

७. महापालिकेचे ‘भाभा रुग्णालय’, कुर्ला

८. महापालिकेचे ‘राजावाडी रुग्णालय’, घाटकोपर

*खाजगी रुग्णालये*

९. ब्रिच कॅंडी रुग्णालय

१०. एच एन रिलायन्स रुग्णालय

११. लीलावती रुग्णालय

१२. रहेजा रुग्णालय

१३. हिंदुजा रुग्णालय

१४. फोर्टीस रुग्णालय

१५. बॉम्बे हॉस्पिटल

१६. वोक्हार्ट रुग्णालय

१७. कोकीळाबेन रुग्णालय

१८. नानावटी रुग्णालय

१९. हिरानंदानी रुग्णालय

First Published on: March 26, 2020 2:33 PM
Exit mobile version