करोना इफेक्ट; निर्मनुष्य रस्त्यांवर सापांचा वावर वाढला!

करोना इफेक्ट; निर्मनुष्य रस्त्यांवर सापांचा वावर वाढला!

करोना इफेक्ट; निर्मनुष्य रस्त्यांवर सापांचा वावर वाढला!

राज्यात करोना दिवसागणीक वाढत आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक स्पर्धा, कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तसेच गर्दी टाळण्यासाठी धार्मिक स्थळे देखील बंद करण्यात आली आहेत. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे सर्वत्र शुकशुकाट पहायला मिळतो आहे. अनेक रस्ते ओसाड पडले आहेत. यामुळे अनेक प्राणी, पक्षी रस्त्यांवर पहायला मिळत आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांवर साप वावर करताना दिसले आहेत. अशीच घटना खालापूर तालूक्यात घडली आहे.

करोनाच्या दहशतीने रस्ते निर्मनुष्य झाले असून, संचारबंदीमुळे नागरिक बाहेर पडत नसल्याने सापांचा वावर वाढला आहे. खालापूर तालुक्यातील चौकनजीक वावंढळ गावात सहा फुटी नागराजाच्या संचाराने सर्वांची तारांबळ उडाली. सर्पमित्र दिनेश ओसवाल यांनी नागाला पकडून सुरक्षित स्थळी सोडल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला.


हेही वाचा – Good news : भारतालाही करोना टेस्टिंग किट निर्मितीत यश, पुण्यात दिवसाला १ लाख किट्सची निर्मिती


वावंढळचे माजी उपसरपंच सुरेश कदम यांना परसात सेफ्टी टाकीजवळ नागाचा वावर दिसला. नाग अडगळीत जाऊन बसल्यामुळे सर्वांची भंबेरी उडाली. सर्पमित्राला बोलावून नाग पकडण्याचा सल्ला कदम यांना ग्रामस्थांनी दिल्यानंतर खोपोली येथे राहणारे ओसवाल यांना फोनवरून माहिती देण्यात आली. अवघ्या १५ मिनिटांत ते कदम यांच्या घरी पोहचले. नाग आहे याची खात्री केल्यानंतर योग्य पद्धतीने अवघ्या पाच मिनिटातच त्याला पकडण्यात यश आले. त्यानंतर नागाला सुरक्षित स्थळी सोडण्यात आले.

 

First Published on: March 24, 2020 6:03 PM
Exit mobile version