Maharashtra Corona Update: राज्यात २७ हजारांहून अधिक नवे कोरोना रुग्ण 

Maharashtra Corona Update: राज्यात २७ हजारांहून अधिक नवे कोरोना रुग्ण 

Maharashtra Corona Update : चिंताजनक! राज्यात 1,134 कोरोनाबाधितांची नोंद, ३ जणांचा मृत्यू

महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. गुरुवार आणि शुक्रवारी राज्यात २५ हजारहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. शनिवारी हा आकडा अधिकच वाढल्याचे पाहायला मिळाले. आज राज्यात २७ हजार १२६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. मागील दोन दिवसांपेक्षा हा आकडा साधारण दीड हजाराने वाढला. राज्यात आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १,८२,१८,००१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २४,४९,१४७ (१३.४४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९ लाख १८ हजार ४०८ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये, तर ७ हजार ९५३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

९२ कोरोनाबाधितांचा मृत्यू 

राज्यात मागील २४ तासांत कोरोनामुळे ९२ जणांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्युदर २.१८ टक्के इतका आहे. आज दिवसभरात राज्यात १३ हजार ५८८ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आजपर्यंत २२ लाख ०३ हजार ५५३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट ८९.९७ टक्के इतका झाला आहे.

मुंबईत २ हजार ९८२ नवे रुग्ण

मुंबईत शनिवारी दिवसभरात २ हजार ९८२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात झाली. तर १ हजार ७८० कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज मुंबईत ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत २१ हजार ३३५ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.

First Published on: March 20, 2021 9:29 PM
Exit mobile version