CoronaVirus : कुर्ला नेहरूनगर एसटी डेपोत कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण

CoronaVirus : कुर्ला नेहरूनगर एसटी डेपोत कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या साथीच्या रोगाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राची राजधानी मुंबईला बसला आहे. आता बेस्टनंतर एसटी महामंडळाच्या कुर्ला नेहरूनगर आगारातील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहेत. कोरोनाबाधित कर्मचाऱ्याला राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहेत. तसेच कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांना संपर्कात आलेल्या ७ कर्मचाऱ्यांना होम क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळांनी दिली आहेत.

कोरोना विषाणूमुळे २३ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. कोरोना विषाणूविरोधात लढाईत वैद्यकीय सेवा बजावणारे डॉक्टरर्स , परिचारिका महापालिका, पोलीस, बँक, महाराष्ट्र शासन व इतर कर्मचारी अत्यावश्यक सेवेकरिता कार्यरत आहेत. या सर्व अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मुंबई, ठाणे, रायगड व पालघर या जिल्हयातून कर्तव्यावर येण्यासाठी व त्यांनतर पुन्हा घरी जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने बसेस अत्यावश्यक सेवा म्हणून चालविण्यात येत आहे.

या अत्यावश्यक सेवेत काम करणारे चालक / वाहक, वाहतूक नियंत्रक, कार्यशाळा कर्मचारी व इतर संबंधित कर्मचारी अधिकारी हे देखील अत्यावश्यक सेवा म्हणून जीवाची पर्वा न करता कर्तव्य पार पाडत आहे. मात्र आता यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय आहे. एसटीच्या कुर्ला नेहरू नगर आगारात एक यांत्रिकी कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना बाधित कर्मचाऱ्याला कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. तसेच कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांना संपर्कात आलेल्या ७ कर्मचाऱ्यांना होम क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक शेखर चैन यांनी दिली आहे.

First Published on: May 1, 2020 11:53 PM
Exit mobile version