देशभरातल्या ३२५ जिल्ह्यांमध्ये करोनाचा शिरकाव नाही

देशभरातल्या ३२५ जिल्ह्यांमध्ये करोनाचा शिरकाव नाही

 देशभरातल्या ३२५ जिल्ह्यांमध्ये करोनाचा शिरकाव झालेला नाही अशी माहिती केंद्राच्या आरोग्य विभागाने दिली आहे. देशाच्या दृष्टीने ही महत्त्वाची बाब आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. काही वेळापूर्वी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे.

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, गेल्या २४ तासांत देशात करोना विषाणूचे ९४१ नवीन रुग्ण आढळले आहेत आणि या विषाणूमुळे ३७ जणांचा मृत्यू झाला आहे, असे आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव्ह अग्रवाल म्हणाले. कोविड -१९च्या संसर्गासाठी बनविल्या जाणार्‍या योजनेबाबत जिल्हास्तरावर चर्चा करण्यात आल्याची माहिती सचिवांनी दिली. ते म्हणाले की दोन चिनी कंपन्यांकडून रॅपिड अँटीबॉडी टेस्ट किटसह पाच लाख चाचणी किट भारताला मिळाल्या आहेत.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर)चे डॉ. रमन आर. गंगाखेडकर म्हणाले की, रॅपिड कोविड -१९ चाचणी किट प्रारंभिक निदानासाठी वापरली जाणार नाही. तो फक्त महामारी विज्ञानाच्या उद्देशानेच वापरला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. आत्तापर्यंत २,९०,४०१ लोकांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी बुधवारी ३०,०४३ जणांची चाचणी घेण्यात आली.

First Published on: April 17, 2020 6:47 AM
Exit mobile version