CoronaVirus : ग्रीन, ऑरेंज झोनचे निकष बदलले; बघा तुमच्या जिल्ह्याला कोणते लागू होतात!

CoronaVirus : ग्रीन, ऑरेंज झोनचे निकष बदलले; बघा तुमच्या जिल्ह्याला कोणते लागू होतात!

राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा आता ५ हजारांच्या वर गेला आहे. अजूनही रोज नवनवे रुग्ण सापडत आहेत. मात्र, सर्वाधिक रुग्ण पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड या भागांमध्ये सापडत आहेत. राज्यातल्या इतर जिल्ह्यांमध्ये रुग्णांची संख्या कमी आहे. त्यामुळे राज्यातल्या जिल्ह्यांचे रेड झोन, ऑरेंज झोन आणि ग्रीन झोन असे तीन झोन करण्यात आले आहेत. त्यानुसार स्थानिक उद्योगधंदे किंवा इतर व्यवहारांना परवानगी देण्यात आली आहे. याआधी कुठल्या जिल्ह्यात एकूण किती कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत, त्यानुसार त्यांची वर्गवारी करण्यात येत होती. त्यानुसार, पुढीलप्रमाणे जिल्ह्यांची वर्गवारी झाली होती.

रेड झोन –

मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड, नागपूर, औरंगाबाद, सांगली

ऑरेंज झोन – 

कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, उस्मानाबाद, बीड, जालना, हिंगोली, लातूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम, गोंदिया, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा

ग्रीन झोन

नांदेड, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, धुळे, नंदुरबार, सोलापूर, वर्धा, परभणी

याच आधारावर २० एप्रिलनंतर त्या त्या जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनचे नियम सोशल डिस्टन्सिंग पाळून काही प्रमाणात शिथिल करण्यात आले होते. मात्र, आता या झोनचे निकष बदलण्यात आले आहेत.

काय आहेत निकष?

रेड झोन – रेड झोनबद्दल आधी अस्तित्वात असलेल्या नियमाप्रमाणेच कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १५ पेक्षा जास्त असल्याचा निकष कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे, मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड, नागपूर, औरंगाबाद, सांगली हे जिल्हे अजूनही रेड झोनमध्येच आहेत.

ऑरेंज झोन – ऑरेंज झोनसाठी रुग्णसंख्येचा निकष बदलून आता दिवसांचा निकष लावण्यात आला आहे. त्यानुसार १४ दिवसांपेक्षा जास्त दिवस कोणत्या जिल्ह्यात एकही नवीन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला नाही, तर तो जिल्हा ऑरेंज झोनमध्ये येतो. यानुसार नवी यादी अजूनपर्यंत सरकारकडून जाहीर करण्यात आलेली नाही.

ग्रीन झोन – ग्रीन झोनसाठीचे निकष बदलून इथेही आता दिवसांचा निकष लावण्यात आळा आहे. त्यानुसार ज्या जिल्ह्यांमध्ये सलग २८ दिवस कोरोनाचा कोणताही नवीन रुग्ण सापडला नाही, अशा जिल्ह्यांचा समावेश ग्रीन झोनमध्ये करण्यात येतो. या झोनचीही नवीन अजूनपर्यंत सरकारकडून जाहीर करण्यात आलेली नाही.

First Published on: April 21, 2020 12:29 PM
Exit mobile version