Corona Update: कोरोनाचा कहर! सातारा जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू

Corona Update: कोरोनाचा कहर! सातारा जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू

Corona Update: कोरोनाचा कहर! सातारा जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू

राज्यातील काही जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे लॉकडाऊन आणि कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आता साताऱ्याच्या पालकमंत्र्यांनी देखील जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. महामार्ग वगळता सर्व ठिकाणी या संचारबंदीची अंमलबजावणी केली जाणार आहे, अशी माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे. साताऱ्यातील शाळा सुरू राहणार असून यादरम्यान शाळांमध्ये तपासणी पथके पाहणी करणार आहेत.

साताऱ्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांचे प्रमाण १००च्या आसपास आहे. पण एकंदरीत राज्यातील कोरोनाचा वाढताना प्रादुर्भाव आणि कोरोनाचे बदलते म्युटेशन हे लक्षात घेऊन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी शाळेत कोरोना पॉझिटिव्ह विद्यार्थी आणि कर्माचारी आढळल्यामुळे शाळांसंदर्भात कठोर निर्णय घेण्यात आला आहे. शाळांमध्ये वेगवेगळी पथके पाठवून शाळांची पाहणी केली जाणार आहे. विद्यार्थी आणि शाळेतल्या कर्मचाऱ्यांनी मास्क लावलेत का? सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात आहे का? इत्यादी सर्वांची माहिती घेतली जाणार आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येला आळा घालण्यासाठी साताऱ्यात कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी साताऱ्यातील पुसेगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेतील सहा विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली होती. एका विद्यार्थींच्या आजोबांना कोरोना झाल्यामुळे तिला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे या विद्यार्थींमुळे शाळेतील पाच जणांचा कोरोनाची लागण झाली होती.


हेही वाचा – मिरवणुका, मोर्चे, यात्रांवर बंदी असतानाही उस्मानाबादमध्ये शेतकऱ्यांचा मोर्चा


 

First Published on: February 22, 2021 4:49 PM
Exit mobile version