CoronaVirus: राज्यात कोरोनाचा आकडा वाढला

CoronaVirus: राज्यात कोरोनाचा आकडा वाढला

राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत पुन्हा वाढ झाल्याची ताजी आकडेवारी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज महाराष्ट्रात आणखी ३३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंतच्या आकडेवारीनुतार सर्वाधिक रुग्ण हे पुण्यातील असून तिथे १९ रुग्णांची नोंद झाली आहे. तर त्या पाठोपाठ मुंबईमध्ये ११ रुग्ण आढळले आहेत. तसेच सातारा, नगर आणि वसईमध्ये प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे. याच पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी पाच वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महत्वाची बैठक घेणार असून यामध्ये सर्व अधिकारी, मुख्य सचिव, तसेच सर्व जिल्हा अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ते संवाद साधणार आहेत.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची आकडेवारी

एकूण ३३

हेही वाचा – दिवे लाण्याऐवजी अतिशहणपणा केला आणि चांगलाच नडला

देशातील कोरोनाबाधितांची संख्याही वाढली

देशात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असतानाच आता कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्याही शंभरीपार गेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत १०९ जणांना या आजारामुळे मृत्यू झाला असून कोरोनाबाधितांची संख्या ही ४ हजारांवर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रायलाने ही माहिती दिली आहे. आरोग्य मंत्रालयाने आज सकाळी एक पत्रक जारी केले असून यामधील आकडेवारीनुसार देशात आता ४ हजार ०६७ कोरोनाबाधित झाले आहेत. तर ३ हजार ६६६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील २९१ रुग्ण बरे झाले असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

First Published on: April 6, 2020 11:34 AM
Exit mobile version